छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित सहा लाख शेतकऱ्यांसाठी बैठक
Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Samman Yojana
मुंबई: 2017 मध्ये तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारने राबविलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत या (Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Samman Yojana)आठवड्यात महाराष्ट्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
महाऑनलाइन कडून मिळालेल्या कर्जदारांच्या डेटामध्ये काही अडचणी येत असल्याने कर्जमाफी प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. या बैठकीत महाआयटी, महाऑनलाइनचे अधिकारी, वित्त विभागाचे(Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Samman Yojana) सचिव, सहकार विभागाचे सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानमंडळात याबाबत आश्वासन दिले होते. त्यामुळे या बैठकीत तांत्रिक अडथळे दूर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळेल यावर चर्चा होणार आहे.
वाचा|Pesticides | शेतकऱ्यांच्या ‘पांढऱ्या अळी’ आणि ‘दीमख’च्या चिंतेवर मात करणारा ‘टर्नर’ लाँच!
तत्कालीन सरकारने 2017 मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफ करण्यासाठी(Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Samman Yojana) ही योजना राबवली होती. ही योजना महाऑनलाइनद्वारे राबविण्यात आली होती.
मात्र, महाविकास आघाडी सरकारने ‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना’ नावाची नवीन योजना राबवली. त्यामुळे पहिल्या योजनेत पात्र ठरलेल्या आणि कर्जमाफी मिळालेले नाही अशा सहा लाख शेतकऱ्यांना दुसऱ्या योजनेतही लाभ मिळाला नाही.
महाऑनलाइन बंद झाल्यामुळे त्याचा डेटा पुनर्स्थापित करणे शक्य नसल्याचे आयटी विभागाने सहकार विभागाला कळवले आहे.
त्यामुळे महाऑनलाइनमधील माजी अधिकारी आणि तज्ञांच्या मदतीने डेटा पुनर्स्थापित करता येईल का याचीही चाचणी करण्याची सूचना महाआयटीला देण्यात आली आहे.
या बैठकीत डेटा पुनर्स्थापित करण्यासाठी सर्व शक्यतांचा विचार करून पुढील मार्ग ठरवण्यात येणार आहे.