ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Agriculture Advisory | शेतकऱ्यांनो पुढचे पाच दिवस राज्यात उष्णतेच्या लाटेसह जोरदार गारपिटीचा इशारा; जाणून घ्या हवामान आधारित कृषी सल्ला

Agriculture Advisory | भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार,
पुढील पाच दिवस आकाश आंशिक ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील 5
दिवस हवामान (Agriculture Advisory) कोरडे राहण्याची अधिक शक्यता आहे. दिनांक 5 जून रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेच्या
लाटेची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांत गारपिट होण्याचा देखील अंदाज आहे. चला तर मग हवामान आधारित कृषी सल्ला (Agriculture Advisory) जाणून घेऊयात.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

कृषी सल्ला
पावसाळ्यात शेतातील पाणी जागेवरच मुरवण्यासाठी तसेच वाऱ्यासोबत मौल्यवान मातीचा थर वाहून जाऊ नये म्हणून जमिनीची मशागत (नांगरणी, वखरणी) करताना मुख्य उतारला आडवी किंवा समतल रेषा काढून या रेषेला समांतर करावी. सद्यस्थितीमध्ये असणारे तापमान लक्षात घेता, उन्हाळी भाजीपाला पिकाचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी ग्रीन शेड नेटचा वापर करावा.

कसे कराल नियोजन?
नवीन लागवड केलेल्या 1 ते 4 वर्ष वयाच्या फळझाडांच्या आळ्यात पाला पाचोळा, गव्हांड्याचे आच्छादन करावे. लहान रोपांवर पऱ्हाटी किंवा तुऱ्हाटीचे छप्पर करावे. वाढत्या तापमानाचा अंदाज लक्षात घेता, शेतीमधील महत्वाची कामे ही सकाळी 11 वाजता पूर्वी करण्यास प्राधान्य द्यावे. माती परीक्षणासाठी मातीचे नमुने काढून ते अधिकृत किंवा शासकीय मृदा परीक्षण प्रयोगशाळेत
योग्य शुल्कासह पाठवून माती परीक्षण अहवालानुसार पिक परत्वे कृषी निविष्ठाचे नियोजन करावे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

कधी कराल लागवड?
खरीप
भाजीपाला पिकाची रोपे तयार करण्याकरिता गादी वाफ्यावर (रोपवाटिका) बियाणे पेरावे. मिरची, वांगी, टोमॅटो यांच्या बियाण्यास ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून योग्य अंतरावर ओळीत टाकावे. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा 80 ते 100 मिमी
पाऊस पडल्यानंतरच करावी.

Web Title: Farmers warned of heavy hailstorm along with heat wave in the state for the next five days; Learn Climate Based Agriculture Advice

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button