ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Health Card | महत्वाची बातमी! आता गोल्डन कार्ड काढा ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवा; पाहा सरकारची योजना

Health Card | २३ जुलै २०२३ रोजी राज्य सरकारने एका ऐतिहासिक निर्णयात आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रित करून “आयुष्मान भारत-महात्मा फुले जनआरोग्य योजना” नावाची नवीन योजना ( Health Card) राबवण्याची घोषणा केली. या योजनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील ३३ लाख ४७ हजार ५५५ लाभार्थी आता पाच लाखांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकणार आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक लाभार्थीकडे “आयुष्मान गोल्डन कार्ड” असणे आवश्यक आहे. हे कार्ड आपले सरकार सेवा केंद्र आणि सेतू सुविधा केंद्रातून मोफत बनवले जाऊ शकते.

योजनेत समाविष्ट असलेल्या काही प्रमुख रुग्णालयांमध्ये कुंभारी अश्विनी ग्रामीण रुग्णालय, रिलायन्स हॉस्पिटल कुंभारी, कासलीवाल बालरुग्णालय, चिडगूपकर रुग्णालय, ह्दयम सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, गंगामाई रुग्णालय, सोलापूर कॅन्सर रुग्णालय, सिद्धेश्वर कॅन्सर रुग्णालय, रघोजी किडनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, युगंधर सुपर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल) यांचा समावेश आहे.

योजनेची सद्य:स्थिती:

 • एकूण लाभार्थी: २३,४७,५५५
 • एकूण रुग्णालये: ५१
 • योजनेतील आजार: १३६५
 • आतापर्यंत कार्ड काढलेले: १०.३० लाख

या योजनेसाठी पात्रता:

 • पिवळे रेशनकार्ड, अंतोद्‌य व अन्नपूर्णा योजनेतील शिधापत्रिकाधारक
 • केशरी रेशनकार्डधारक
 • शासकीय अनाथालयातील विद्यार्थी
 • शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थी
 • शासकीय महिला आश्रम
 • शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ
 • माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील पत्रकार व त्यांचे कुटुंब
 • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडील नोंदणीकृत कामगार व त्यांचे कुटुंब

या योजनेत लवकरच पांढरे रेशनकार्ड असणाऱ्यांनाही समाविष्ट केले जाणार आहे.

मुख्यमंत्री सहायता निधी:

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडूनही रुग्णांना विविध आजारांसाठी अर्थसहाय केले जाते. सोलापूर जिल्ह्यात १०२ रुग्णालयांची नोंदणी आहे. जास्तीत जास्त दोन लाखांची मदत मिळू शकते. अधिक माहितीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाशी संपर्क साधा.

*या योजनेमुळे गरीब आणि गरजू लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर “आयुष्मान गोल्डन कार्ड” बनवून घ्यावे.

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button