ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Construction Worker Scheme | ‘बांधकाम कामगार योजनें’तर्गत कामगारांना आर्थिक सहाय्य ते ‘या’ सुविंधाचा मिळतोय लाभ, त्वरित करा नोंदणी प्रक्रिया

Construction Worker Scheme | Under the 'Construction Worker Yojana' workers are getting the benefit of financial assistance to 'this' facility, complete the registration process immediately.

Construction Worker Scheme | केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी योजना (Construction Worker Scheme) राबवण्यात येत आहेत. जेणेकरून प्रत्येक माणूस आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत आहे. त्यापैकीच एक असणारी ‘बांधकाम कामगार योजना’ होय. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वाचा| शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सिंचन विहिरींसाठी 100 टक्के अनुदानासाठी मंजुरी, जाणून घ्या सविस्तर

बांधकाम कामगार योजनेंतर्गत कोणते लाभ मिळतात?
आर्थिक सहाय्य:
‘बांधकाम कामगार योजने’तंर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिले जाते. ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.

वैद्यकीय लाभ:
बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना (पत्नी, अविवाहित मुले) रुग्णालयात दाखील झाल्यास वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदत मिळते. अपघात विमा योजना देखील उपलब्ध आहे.

शिक्षण सहकार्य:
बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक खर्चासाठी शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते.

सामाजिक सुरक्षा:
अपंगत्व, वृद्धत्व आणि मृत्यूच्या बाबतीत आर्थिक मदत मिळते.

इतर योजना:
कौशल्य विकास कार्यक्रम, निवासस्थानासाठी सवलत, कल्याण भंडार आदी योजनांचा देखील लाभ घेता येतो.

काय आहे पात्रता?
बांधकाम व्यावसायात किमान सहा महिने काम करणारे कामगार.
18 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्ती नोंदणी करू शकतात.
सदर व्यक्तीने कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

नोंदणीचे फायदे:
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. यामुळे बांधकाम कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्राप्त होते.

नोंदणी प्रक्रिया कशी करावी?
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयात जाऊन किंवा MAHABOCW पोर्टल (https://mahabocw.in/) द्वारे ऑनलाइन नोंदणी करता येते.

आवश्यक कागदपत्रे:
अर्जासाठी आधार कार्ड, बँक खाते तपशील, राशन कार्ड आणि कामगार असल्याचे पुरावे (हजर हजेरीपत्रक, पगार पर्ची इ.) आवश्यक आहेत.

Web Title| Construction Worker Scheme | Under the ‘Construction Worker Yojana’ workers are getting the benefit of financial assistance to ‘this’ facility, complete the registration process immediately.

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button