ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Update | हवामानाच्या रोलरकोस्टरवर! विदर्भात पाऊस आणि गारपीट, तर इतर महाराष्ट्र उन्हाच्या झळाशी!

Weather Update | On the weather rollercoaster! Rain and hail in Vidarbha, while the rest of Maharashtra is in the heat!

Weather Update | महाराष्ट्रच्या हवामानाने पुन्हा एकदा वेगळं रूप धारण केलं आहे. काही भागात सूर्यकिरणांचा चटका लावला आहे तर काही भागात पावसाची (Weather Update ) धक्कादायक एण्ट्री झाली आहे.

विदर्भात वादळी आणि गारपीटचा संभाव्य धोका!

हवामान विभागाने विदर्भातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. या पावसाबरोबरच गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी ही चिंता वाढवणारी बातमी आहे. विशेषत: वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडाडाटासह पावसाला आणि गारपीटला (Weather Update) सामोरे जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी 17 ते 19 मार्च दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मराठवाड्यात वादळींसह पावसाची शक्यता

विदर्भाबरोबरच मराठवाड्यातही 19 मार्च रोजी वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागात मात्र पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

वाचा | Mukhyamantri Vyoshree Yojana | 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणारं 3 हजार रुपये आणि इतरही लाभ, वाचा काय आहे ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’?

पुणे, मुंबई आणि सोलापूर उन्हाच्या चपेटात!

हवामानाच्या या खेळात काही जण थिजून तर काही जण भाजून निघणार आहेत. कारण पुणे, मुंबई आणि सोलापूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यातच तापमान वाढल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे.

पुढील काही दिवसांत काय?

हवामान विभागाने पुढील 3 ते 4 दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे ज्या भागात पाऊस येण्याची शक्यता आहे तेथील शेतकऱ्यांनी आपला पिक धान्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच उन्हा वाढण्याची शक्यता असलेल्या भागात राहणाऱ्यांनीही उन्हापासून बचावण्याच्या उपायांची पूर्वकल्पना करावी.

Web Title | Weather Update | On the weather rollercoaster! Rain and hail in Vidarbha, while the rest of Maharashtra is in the heat!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button