ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Update| अवकाळी पावसाची हजेरी, काही भागात गारपीटीची शक्यता!

Weather Update| Presence of unseasonal rain, possibility of hail in some areas!

Weather Update | देशात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे राज्यासह देशात अनेक भागात पावसाची रिमझिम सुरू आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील 24 तासात देशासह राज्यातील काही भागात पावसाची (Weather Update) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उन्हापासून दिलासा, काही भागात गारपीट:

  • पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तर ओडिशा, पूर्व झारखंड, पूर्व विदर्भ, छत्तीसगड आणि अरुणाचल प्रदेशात वादळ, सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता.
  • छत्तीसगड, पूर्व झारखंड, पश्चिम बंगाल, पश्चिम आणि उत्तर ओडिशा मध्ये गडगडाट होण्याची शक्यता.
  • विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये गारपीट होण्याची शक्यता.

वाचा |रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी शेडसाठीही अनुदान!

26 ते 29 मार्च पर्यंत अवकाळी पाऊस:

  • आज 26 मार्च 2024 रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय आणि सिक्कीममध्ये जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता.
  • 26 मार्च ते 29 मार्च दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि वायव्य भारताच्या लगतच्या मैदानी भागात पाऊस आणि गडगडाटी पावसाची शक्यता.
  • 28 आणि 29 मार्चला सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता.
  • 26 ते 29 मार्च दरम्यान देशात काही भागात अवकाळी पावसाची शक्यता.

शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी:

हवामान विभागाने शेतकऱ्यांना या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीपासून सावध राहण्याचा आणि पिकांचे योग्य व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला आहे.

Web Title| Weather Update| Presence of unseasonal rain, possibility of hail in some areas!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button