ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Election Commission | निवडणूक आचारसंहिता लागू! काय काय बंदी आहे? नियम डावलल्यास शिक्षा काय?

Election Commission | Election code of conduct applies! What is banned? What is the punishment for breaking the rules?

Election Commission | लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने (Election Commission) आदर्श आचारसंहिता (Model Code of Conduct) लागू केली आहे. ही आचारसंहिता निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहील आणि या काळात अनेक कामांवर बंदी घातली जाते.

आचारसंहिता काय?
निवडणुकीची
निष्पक्ष आणि पारदर्शकपणे matdaan प्रक्रिया राखण्यासाठी निवडणूक आयोगाद्वारे तयार केलेले नियम.
हे नियम सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना समान रीतीने लागू होतात.

  • आचारसंहिता काळात काय काय बंदी आहे?
  • सरकारी धोरणात्मक निर्णय: निवडणूक आचारसंहिता काळात सरकार नवीन धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही.
  • सरकारी योजना: कोणत्याही नवीन सरकारी योजनेचे उद्घाटन किंवा अंमलबजावणी करता येणार नाही.
  • सरकारी कर्मचाऱ्यांची बदली: सरकारी कर्मचाऱ्यांची बदली आणि पदोन्नतीवर बंदी.
  • सरकारी वाहन आणि कर्मचाऱ्यांचा वापर: निवडणुकीच्या प्रचारात सरकारी वाहन आणि कर्मचाऱ्यांचा वापर करण्यास मनाई.

वाचा | Agriculture Scheme | आनंदाची बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात 50 कोटींचा फळबाग अनुदान निधी येणार

  • धार्मिक स्थळांचा वापर: निवडणुकीच्या प्रचारात धार्मिक स्थळांचा वापर करता येणार नाही.
  • पोलिस परवानगी: निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा आणि रॅलीसाठी पोलिसांची परवानगी आवश्यक.
  • बॅनर आणि पोस्टर्स: परवानगीशिवाय घर, दुकान, जमीन किंवा आवारात बॅनर आणि पोस्टर्स लावता येणार नाहीत.
  • मुलांचा वापर: निवडणूक प्रचारात मुलांचा वापर करण्यास मनाई.
  • होर्डिंग: राजकीय पक्षाचे होर्डिंग काढावे लागतील.
  • रात्री 10 नंतर सभा: सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंतच सभा घेता येतील. 48 तासांपूर्वी सभा आणि मिरवणुकीवर बंदी.
  • नियम डावलल्यास शिक्षा:
  • निवडणूक आचारसंहिता भंग केल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते.
  • दंडात्मक कारवाई होऊ शकते.

Web Title | Election Commission | Election code of conduct applies! What is banned? What is the punishment for breaking the rules?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button