ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Update | फेब्रुवारी-मार्चमध्ये उन्हाच्या झळाया! हवामानातील मोठ्या बदलांमुळे ‘या’ भागांतील शेतकऱ्यांना इशारा…

Weather Update | हिवाळा उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. परंतु सध्या हवामानात मोठे बदल होत आहेत. म्हणजेच पहाटे थंडीचा वारा लागत आहे. तर दिवसा उन्हाच्या (Weather Update) झळया लागत आहे. या उन्हाच्या झळ्यांमुळे फेब्रुवारी महिन्यातच घामाच्या धारा लागले आहेत. याच उन्हामुळे या हवामान विभागाकडून (Weather Update) नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील शेती पिकांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

फेब्रुवारी मार्चमध्ये उन्हाच्या झळया
सध्या संपूर्ण देशातील नागरिकांना उन्हाच्या झळया सोसाव्या लागत आहेत. यामुळे नागरिकांना प्रचंड काळजी घ्यावी लागत आहे. इतकचं नाही, तर नागरीकांना या उन्हाच्या (Weather update Maharashtra) कायम झळया सोसाव्या लागणार आहेत. हवामान विभागाकडून (Meteorological Department) फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात या उन्हाच्या झळया राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Summer | पहाटेचा थंड वारा अन् दिवसभर चढतोय उन्हाचा पारा! उन्हाळ्यात ‘अशा’ प्रकारे आपलं आरोग्य सांभाळा

महाराष्ट्रात येणार उष्णतेची लाट?
महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याचा देखील अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागात मागच्या रविवारी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला होता. परंतु तो अंदाज चुकीचा ठरला होता. त्याचवेळी तिथे किमान तापमान 4 ते 5 डिग्री असे राहिले होते. तसेच उत्तर आणि पश्चिम भारतात उष्णता प्रचंड वाढली आहे. तापमानाचे रेकॉर्ड मोडले जात आहेत.

शेतकऱ्यांना हवामान विभागाचा इशारा
या उष्णतेचा शेतकऱ्यांच्या पिकांना देखील फटका बसणार आहे. यामुळेच हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना देखील त्यांच्या पिकाबाबत जागृत राहण्याचा सल्ला दिला आहे. कारण या उष्णतेमुळे शेतकऱ्यांचे पीक जळू शकते. म्हणूनच शेतकऱ्यांनी पिकाला सिंचन करावे असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Summer in February! Citizens and farmers are also warned due to major changes in climate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button