हवामान

Weather Update | ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांची पिके धो-धो झोडपणार! वादळी पाऊसासह जोरदार गारपीटीचा इशारा; जाणून घ्या कुठे?

Weather Update | Farmers' crops will be destroyed in the summer! Severe hail warning with thunderstorms; Know where?

Weather Update | राज्यात सध्या हवामानात चढ-उतार होत आहे. पहाटे गारठा आणि दिवसा उन्हाचा तडाखा अनुभवायला मिळत आहे. निफाड येथे तापमान ५ अंशांपर्यंत घसरल्याने हुडहुडी (Weather Update) वाढली आहे. तर धुळे, पुणे, नाशिक येथे तापमान ११ अंशांच्या खाली आला आहे. याच पार्श्वभूमीवर विदर्भात वादळी पावसासह गारपीट होण्याचा इशारा (ऑरेंज अलर्ट) तर मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

हवामानातील बदल:

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहे. निफाड, धुळ्यासह मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाली आहे. निफाड येथे पारा ५ अंशांपर्यंत घसरल्याने हुडहुडी वाढली आहे. तर धुळे येथे ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पुणे, नाशिक येथे तापमान ११ अंशांच्या खाली आला आहे. तर अनेक ठिकाणी कमाल तापमान ३४ अंशाच्या पुढे असल्याने दुपारी उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे.

पावसाची शक्यता:

मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली असली तरी मराठवाड्यापासून विदर्भ, छत्तीसगड ते आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी पर्यंत खंडीत वाऱ्यांची स्थिती विरली आहे. छत्तीसगडपासून विदर्भ, कर्नाटक ते उत्तर तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे पावसाला पोषक हवामान होत आहे.

वाचा | PM Kisan Yojana | एकाच घरातील वडील आणि मुलालाही मिळतो पीएम किसान योजनेचा लाभ? जाणून घ्या नियम

इशारा आणि अंदाज:

आज (ता. २६) विदर्भात वादळी पावसाची शक्यता असून, विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात गारपीट होण्याचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा ‘यलो अलर्ट’ तर उर्वरित मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तापमानातही चढ-उतार होण्याचा अंदाज आहे.

Web Title | Weather Update | Farmers’ crops will be destroyed in the summer! Severe hail warning with thunderstorms; Know where?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button