ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Update | हवामानाबाबत मोठी अपडेट! शेतकऱ्यांनो राज्यातील ‘या’ भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा, पाहा कुठे?

Weather Update | Big weather update! Farmers, warning of heavy rain with lightning in 'these' parts of the state, look where?

Weather Update | राज्यात पावसाला पोषक हवामान निर्माण झाल्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. त्याचबरोबर उन्हाचा तीव्रता आणि उकाडाही वाढला आहे. हवामान विभागाने (Weather Update) आज (१० फेब्रुवारी) विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला
हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये थंडीची लाट कायम आहे. शुक्रवारी (९ फेब्रुवारी) राजस्थानातील सिकार येथे देशातील सपाट भूभागावरील सर्वात कमी २.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये किमान तापमान ५ ते १० अंशांच्या दरम्यान आहे. उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता
हवामान विभागाने आज (१० फेब्रुवारी) विदर्भ आणि मराठवाड्यातील जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तविली आहे. शुक्रवारी (९ फेब्रुवारी) सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक ३७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सांगली येथे पारा ३५ अंशांच्या वर आहे. किमान तापमानाचा पारा १० ते २० अंशांच्या दरम्यान आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात तापमान १० अंशांच्या खाली घसरले आहे. आज (१० फेब्रुवारी) तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे.

वाचा | Agricultural Technology | धडाका! शेतकऱ्यांना होणार फायदा…हवामानाचा अचूक अंदाज आणि शेती वाचणारा इस्रोचा नवा उपग्रह येतोय!

  • राज्यातील काही शहरांची तापमान नोंद
  • शुक्रवारी (९ फेब्रुवारी) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये):
  • पुणे: ३३.६ (१३.६)
  • धुळे: २९.० (९.४)
  • जळगाव: ३२.९ (१३.८)
  • कोल्हापूर: ३४.० (१९.६)
  • महाबळेश्वर: २९.१ (१७.०)
  • मालेगाव: २९.२ (१६.६)
  • नाशिक: ३०.९ (१३.९)
  • निफाड: ३१.० (१०.२)
  • सांगली: ३५.१ (१८.१)
  • सातारा: ३४.२ (१५.१)
  • सोलापूर: ३७.० (१९.२)
  • सांताक्रूझ: ३३.१ (१९.२)
  • डहाणू: २८.६ (१८.२)
  • रत्नागिरी: ३५.० (१७.६)

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
मराठवाडा: जालना, परभणी, हिंगोली
विदर्भ: बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

Web Title | Weather Update | Big weather update! Farmers, warning of heavy rain with lightning in ‘these’ parts of the state, look where?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button