PM Kisan Yojana | एकाच घरातील वडील आणि मुलालाही मिळतो पीएम किसान योजनेचा लाभ? जाणून घ्या नियम
PM Kisan Yojana | Father and son in the same household also get benefit of PM Kisan Yojana? Know the rules
PM Kisan Yojana | २८ फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ घेण्यासाठी अनेक शेतकरी उत्सुक असतात, पण एकाच घरातील वडील आणि मुलाला योजनेचा लाभ मिळेल का, हा प्रश्न अनेकांना पडतो.
नियमानुसार काय आहे?
सरकारच्या नियमानुसार, एका कुटुंबातील एकाच सदस्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकतो. पण जर वडील आणि मुलगा यांच्या नावावर वेगवेगळ्या जमिनी असतील आणि ते वेगवेगळे राहत असतील तर त्यांना दोघांनाही योजनेचा लाभ मिळू शकतो. अलीकडेच केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या नियमांबाबत नोटीस जारी केली आहे. यात देशातील अनेक लोक पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
वाचा | Tractor Subsidy Scheme | गुडन्यूज! केंद्र सरकार शेतकऱ्यांना निम्म्या किमतीत देतंय ट्रॅक्टर; जाणून लगेच करा खरेदी
- योजनेचे फायदे
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात.
- हे पैसे 2 हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात.
- आतापर्यंत सरकारने 15 हप्ते जारी केले आहेत.
- 15 हप्त्यांमध्ये 2.81 लाख कोटी रुपये जारी केले आहेत.
- याचा फायदा 11 कोटी शेतकऱ्यांना झाला आहे.
- योजनेची अधिक माहिती
- अधिक माहितीसाठी PM किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://pmkisan.gov.in/
- तुम्ही [email protected] वर ईमेलद्वारे संपर्क साधू शकता.
- तुम्ही पीएम किसान योजनेचा हेल्पलाइन क्रमांक – 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर कॉल करून संपर्क साधू शकता.
Web Title | PM Kisan Yojana | Father and son in the same household also get benefit of PM Kisan Yojana? Know the rules
हेही वाचा