ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

PM Kisan | शेतकऱ्यांची दिवाळी! पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे 6 हजार फेब्रुवारीच्या ‘या’ तारखेला होणारं खात्यात जमा

PM Kisan | Farmers' Diwali! 6 thousand of PM Kisan and Namo Shetkari Yojana to be deposited in the account on 'this' date of February

PM Kisan | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आनंद देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) १६ वा आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता या महिन्याच्या २८ तारखेला शेतकऱ्यांच्या (Agriculture) खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी ६ हजार रुपये मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) २८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. अहमदनगर येथे होणाऱ्या कार्यक्रमात या तिन्ही हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या (Agriculture Department) खात्यात जमा करण्यात येणार आहे.

शेतकरी आंदोलन आणि कांदा निर्यात बंदी यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शेतीमालाच्या (Agriculture Scheme) भावातील चढ-उतार आणि इतर कारणांमुळे शेतकरी त्रस्त आहेत. याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसू शकतो, याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या असंतोषाला थोडा आळा घालण्यासाठी दोन्ही योजनांचे तीन हप्ते एकत्रित करण्याचे नियोजन सरकारने केले आहे.

नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा
मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत तीन हप्त्यात सहा हजार रुपये देण्याचे नियोजन होते. मात्र, पहिला आणि दुसरा हप्ता रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. आता ही प्रतीक्षा पूर्ण करत राज्य सरकारने दोन्ही हप्ते एकत्र देण्याचे नियोजन केले आहे.

वाचा | Artificial Intelligence In Agriculture | कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचे काय आहे योगदान वाचा सविस्तर …

हप्त्यांची रक्कम आणि लाभार्थी
राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी १७२० कोटी आणि दुसऱ्या हप्त्यासाठी १७९२ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. या दोन्ही हप्त्यांची रक्कम ३५१२ कोटी रुपये होते. आता यात आणखी २ हजार कोटींची भर पडून ५५१२ कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना सोळावा हप्ता वितरित करण्यात येणार आहे, त्यांना तिसरा हप्ता देण्यात येणार होता. मात्र, राज्य सरकारचे दोन हप्ते आणि केंद्र सरकारचा सोळावा हप्ता एकत्रित होणार असल्याने शेतकऱ्यांची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे वाढीव शेतकऱ्यांची आकडेवारी गृहीत धरून २ हजार कोटी वितरणास मान्यता देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीवर परिणाम
लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या असंतोषाचा फटका बसू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या हप्त्यांचे वितरण करून त्याचे श्रेय लोकसभा निवडणुकीत घेण्याचे नियोजन आहे.

Web Title | PM Kisan | Farmers’ Diwali! 6 thousand of PM Kisan and Namo Shetkari Yojana to be deposited in the account on ‘this’ date of February

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button