ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या
ट्रेंडिंग

Onion Council | राज्यात तब्बल ३९ वर्षांनंतर होणार कांदा परिषद ! ‘या’ महत्त्वाच्या मागण्यांवर होणार चर्चा …

Onion Council | नाशिक,ता. ३ : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे केंद्र (centre) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड (Nifad) मध्ये रविवारी (ता.५) ला कांदा परिषदेचे (onion council) आयोजन करण्यात आले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी रयत क्रांती संघटनेतर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल 39 वर्षानंतर ही कांदा परिषद होत असून या परिषदेच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आक्रोश पाहायला मिळणार आहे.

याआधीही झाली होती कांदा परिषद

शरद जोशी यांनी 1982 साली निफाड मधील रुई या गावात पहिली कांदा परिषद घेतली होती. यावेळी देखील शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचावा, कांद्याला अनुदान मिळावा, हमीभाव मिळावा आदी मागण्यासंदर्भात या परिषदेत विचार मंथन (Discussion) करण्यात आले होते. यानंतर आता दुसऱ्यांदा त्याच गावात ही परिषद होणार आहे.

वाचाYojana | काय सांगता! पीएम आवास योजनेंतर्गत मिळणार तिप्पट रक्कम? जाणून घ्या सविस्तर…

या असतील मागण्या

राज्यात गेल्या काही दिवसापासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक अडचणीत सापडला असताना त्यांच्या मदतीसाठी ( For help) कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर खालील मागण्यांवर चर्चा केली जाईल.

१) कांद्याला अनुदान मिळावे.
२) हमीभाव मिळावा.
३) नाफेड कडून खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याला दर वाढवून मिळावा.
४) शेतकऱ्यांना न्याय मिळावा.

PM Kisaan | काय सांगता? शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे मिळणार घरबसल्या, कसं ते जाणून घ्या सविस्तर

म्हणून निफाड मध्ये होणार कांदा परिषद

नाशिक सह पुणे, आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणत कांदा उत्पादक शेतकरी देखील आहेत. एवढेच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात लासलगाव ही आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ ( onion Market) असल्याचे म्हटले जाते. कांदा उत्पादकांसाठी निफाड केंद्र असल्यामुळे निफाड मध्ये कांदा परिषद होणार आहे. यावेळी अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार असून यामध्ये रयत क्रांती संघेटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांच्यासह भाजप नेते प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर देखील उपस्थित राहणार आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button