ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Rates of Fertilizers | शेतकऱ्यांनो राज्यात खरीप हंगामासाठी खते आणि बियाणे उपलब्ध; पण जाणून घ्या किती वाढले दर?

Rates of Fertilizers | कृषी विभागाकडून स्पष्टीकरण: राज्यात सध्या खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू आहे आणि खतांची (Rates of Fertilizers) आणि बियाण्यांची पुरेशी उपलब्धता आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर खतांचे दर वाढल्याच्या अफवा पसरल्या होत्या, परंतु कृषी विभागाने या अफवांना निराधार ठरवून खताचे दर स्थिर असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

यंदाच्या हंगामात खतांची उपलब्धता:
यंदाच्या हंगामात दरवर्षीच्या तुलनेत जास्त खतांची उपलब्धता असल्यामुळे संपूर्ण खरीप हंगामात दरवाढ होण्याची शक्यता नाही. शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

खतांचे दर:
अनुदानित खतांचे दर हे स्थिर आहेत. खतांचे काही महत्वाचे दर खालीलप्रमाणे आहेत:

  • युरिया: २६६.५० रुपये प्रति गोणी
  • डीएपी: १३५० रुपये प्रति गोणी
  • एमओपी: १६५५ ते १७०० रुपये प्रति गोणी
  • एनपीके (१९ः१९ः१९): १६५० रुपये प्रति गोणी
  • एनपीके (१०ः२६ः२६): १४७० रुपये प्रति गोणी
  • एनपीके (१४ः३५ः१४): १७०० रुपये प्रति गोणी
  • एनपीएस (२०ः२०ः०ः१३): १२००-१४०० रुपये प्रति गोणी
  • एसएसपी (जी): ५३०.५९ रुपये प्रति गोणी
  • एसएसपी (पी): ४९०.५५ रुपये प्रति गोणी

शेतकऱ्यांना आवाहन:
कृषी विभागाने शेतकऱ्यांना खतांच्या खरेदीसाठी अधिकृत विक्रेत्यांकडे जाण्याचे आवाहन केले आहे. खतांचे दर आणि उपलब्धतेबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी कृषी विभागाच्या संबंधित कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button