कृषी बातम्या

Credit Card | क्रेडिट कार्ड आणि तुमचा सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी? शेतकऱ्यांनो कर्जासाठी जाणून घ्या..

Credit Card | क्रेडिट कार्ड वापरणं सोपं आहे, पण त्याचा अतिवापर तुमच्या क्रेडिट (Credit Card) स्कोअरवर परिणाम करू शकतो. अनेकदा ग्राहकांना कार्डच्या मर्यादेपर्यंत खर्च करणं योग्य वाटतं, पण हे चुकीचं आहे. वेळेवर बिलं भरली तरीही तुमचा सिबिल स्कोअर कमी होऊ शकतो.

क्रेडिट युटिलायझेशन रेशो (Credit Utilization Ratio) काय आहे?
तुमच्या कार्डच्या एकूण मर्यादेपैकी तुम्ही किती खर्च करता याचं प्रमाण म्हणजे क्रेडिट युटिलायझेशन रेशो. हे प्रमाण जितकं कमी असेल तितकं तुमच्या क्रेडिट स्कोअरसाठी चांगलं.

वाचा: मेष, मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांच्या सुख-सुविधा वाढणारं, तर ‘या’ राशींचे नशीब चमकणार

तज्ज्ञांचा सल्ला:

 • तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवायचा असेल तर कार्डच्या एकूण मर्यादेच्या 30% पेक्षा जास्त खर्च करू नका.
 • उदाहरणार्थ, जर तुमच्या कार्डची मर्यादा ₹1 लाख असेल तर तुम्ही ₹30,000 पेक्षा जास्त खर्च करू नयेत.

कमी खर्च का करावा?

 • तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो दर महिन्याला अपडेट होतो.
 • जास्त खर्च केल्याने तुम्ही कर्जात बुडाल्यासारखं दिसतं आणि तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो.
 • कर्ज घेण्यासाठी कमी रेशो असणं फायदेशीर ठरतं कारण तुम्हाला कमी व्याजावर कर्ज मिळेल.

हेही वाचा: साठेखत म्हणजे काय? नोंदणीकृत साठेखताचे फायदे काय? जाणून घ्या एका क्लिकवर

अजिबात खर्च केला नाही तर काय?

 • अनेकांना वाटतं की क्रेडिट कार्ड वापरला नाही तर सिबिल स्कोअर चांगला राहील, पण हे खरं नाही.
 • कधीही खर्च न केल्यास तुम्ही कर्जाची परतफेड करण्यास सक्षम नाही असा समज कंपन्यांना होतो आणि तुमचा स्कोअर कमी होतो.

क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यासाठी काय करावे?

 • तुमचा खर्च नेहमीच क्रेडिट मर्यादेच्या 30% आत ठेवा.
 • वेळेवर बिलं भरा.
 • अनेक क्रेडिट कार्ड वापरणं टाळा.
 • तुमचा क्रेडिट स्कोअर नियमितपणे तपासत रहा.

तुमचा क्रेडिट स्कोअर तुमच्या आर्थिक भविष्यासाठी महत्त्वाचा आहे. वरील टिप्स तुम्हाला तुमचा स्कोअर चांगला ठेवण्यास मदत करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button