जॉब्स

Police Constable Recruitment | राज्यात पोलीस शिपाई भरतीची घोषणा, 17,471 पदे भरण्यात येणार!

Police Constable Recruitment | राज्याच्या पोलीस विभागात शिपाई संवर्गातील 17,471 पदाच्या भरतीला मान्यता मिळाली आहे. (Police Constable Recruitment) ही भरती ऑनलाइन किंवा ओएमआर पद्धतीने घेण्यात येणार आहे.

बुधवार (31 जानेवारी) रोजी गृह विभागाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.

या भरती प्रक्रियेद्वारे पोलीस शिपाई, बँडस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशा एकूण 17,471 पदे भरण्यात येणार आहेत.

वित्त विभागाकडून मान्यता:

वित्त विभागाने 30 सप्टेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत. यानुसार, प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता, इतर संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 50 टक्के भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

वाचा | Job Recruitment | तरुणांसाठी खुशखबर ! होमगार्डमध्ये १० हजार पदांसाठी भरती; करा अर्ज..

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस शिपाई संवर्गातील पदाची अत्यंत आवश्यकता असल्याने, 100 टक्के रिक्त पदे भरण्यासाठी वित्त विभागाच्या 30 सप्टेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीमधून सूट देण्यात आली आहे.

परीक्षेची पद्धत:

पोलीस शिपाई भरतीसाठी ऑनलाइन किंवा ओएमआर आधारित परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेची जबाबदारी पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, समादेशक आणि इतर पोलीस प्राधिकारी यांच्याकडे असणार आहे.

अर्ज प्रक्रिया:

पोलीस शिपाई भरती प्रक्रियाअंतर्गत अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्विकृती, छाननी आणि तत्सम कामाकरिता बाह्य सेवापुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण आणि खास पथके, मुंबई यांना देण्यात आले आहेत.

उमेदवारांसाठी सूचना:

  • अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र पोलीस विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • योग्य ती पात्रता आणि निकष पूर्ण करणारे उमेदवारच अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी, सर्व सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचा.

हे पद मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा आणि परीक्षेची तयारी सुरू करावी.

Web Title | Police Constable Recruitment | Police constable recruitment announcement in the state, 17,471 posts will be filled!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button