Mega Recruitment | महाराष्ट्रात १७ हजार पोलिसांची मेगाभरती! जून-जुलैपर्यंत भरती पूर्ण करण्याचे नियोजन, जाणून घ्या पदे कोणती?
Mega Recruitment | Mega recruitment of 17 thousand police in Maharashtra! Planning to complete recruitment by June-July, know what are the posts?
Mega Recruitment | राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी गृह विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य राखीव पोलिस दल, तुरूंग प्रशासन आणि पोलिस खात्यातील १७ हजार रिक्त पदांवर भरती (Mega Recruitment) करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी पुढील आठवड्यात या भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल. उन्हाळा संपल्यानंतर जून-जुलै महिन्यात भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
राज्यातील वाढत्या लोकसंख्या आणि गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणाला लक्षात घेता ही भरती करण्यात येत आहे. गृह विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर नवीन पोलिस ठाणे सुरू होत आहेत आणि त्यासाठीही मनुष्यबळ आवश्यक आहे. मागील वर्षी देखील जवळपास १८ हजार पोलिसांची भरती करण्यात आली होती. त्यातील ६ हजार नवप्रविष्ठ उमेदवारांचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नवीन भरती झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होईल.
वाचा | Job Requirement | सरकारी नोकरीची मोठी संधी! ना परीक्षा ना मुलाखत पोस्ट विभागात डायरेक्ट तरुणांना मिळणार नोकरी, काय आहे पात्रता?
- नवीन भरतीमध्ये कोणती पदे भरण्यात येणार?
- जेल शिपाई: १,९००
- एमआरपीएफ: ४,८००
- पोलिस शिपाई: १०,३००
- एकूण: १७,०००
Web Title | Mega Recruitment | Mega recruitment of 17 thousand police in Maharashtra! Planning to complete recruitment by June-July, know what are the posts?
हेही वाचा