ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
शासन निर्णय

College | शिक्षक मंत्र्यांची मोठी घोषणा! महाराष्ट्रातील ‘या’ 12 जिल्ह्यांत होणारं वैद्यकीय महाविद्यालये

College | आता महाराष्ट्र राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी घेतला आहे. गिरीश महाजन यांनी सांगितल्या प्रमाणे आमची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली आणि या बैठकीत सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे.

मागिल पाच वर्षात एकाही मेडीकल कॉलेजला परवानगी दिली नाही. परंतु, आता बैठकीत साहसी खेळाचा निर्णय घेतल गेला आहे. खासगीपेक्षा सरकारी मेडिकल कॉलेजचा सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होणार आहे. असे महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

वाचा: शिक्षकच दारू पिऊन शाळेत येऊ लागले तर? शाळकरी मुलांच भविष्य धोक्यात, पहा व्हिडिओ

काय आहे हा निर्णय?

तर महाराष्ट्र राज्यातील १२ जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालये नाहीत. त्यामुळे वैद्यकिय शिक्षण विभागासंदर्भात ही बैठक बोलावण्यात आली होती. दरम्यान या बैठकीत राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही महाविद्यालये उभारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंटकडून चार हजार कोटींचं कर्ज दिलं जात आहे आणि या कामांना लवकरच सुरुवात होईल. यासाठी केंद्र सरकारकडूनही निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, असं आश्वासन गिरीष महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे.

वाचा: 36 तासांनंतर येतोय बुध गुरुसोबत म्हणजेच ‘संसप्तक योग’, जाणून घ्या तुमच्या राशीवर काय होणार परिणाम

कोणत्या जिलह्यामध्ये उभारली जाणार आहेत ही महाविद्यालय?

महाराष्ट्रात राज्यात गडचिरोली, वाशिम, हिंगोली, बुलडाणा, भंडारा, पालघर, ठाणे, अहमदनगर, अमरावती, जालना, मुंबई उपनगर आणि वर्धा या १२ जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत, असंही महाजन यांनी सांगितले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : The big announcement made by the Education Minister is that medical colleges will now be established in 12 districts of Maharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button