इतर

Learning |शिक्षकच दारू पिऊन शाळेत येऊ लागले तर? शाळकरी मुलांच भविष्य धोक्यात, पहा व्हिडिओ

शिक्षक हे विद्यार्थांना योग्य मार्गदर्शन करून वाट दाखवण्याचं काम करता असतात परंतु अमरावती (Amravati)जिल्ह्यातील मेळघाटमध्ये (Melghat) शिक्षण व्यवस्थेला काळीमा फासणारी एक धकादायक घटना समोर आली आहे. एका शाळेतील मद्यधुंद शिक्षकाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. यात शाळेतील शिक्षक (Drunk ZP Teacher Viral Video) चक्क वर्गात दारु पिऊन झोपलाय.

शाळेतील विद्यार्थी ऑफ पीरियर मिळला म्हणून मस्ती करत सुटलेत. हे सगळं तेथील एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं असून आता संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये या शिक्षिकाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. अनेक व्हॉट्सअप ग्रूप आणि सोशल मीडियामध्ये या व्हिडीओमुळे सवाल उपस्थित केले जात आहेत. हा सगळा प्रकार आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यातला. धारमी तालुक्यातील काकरमल येथील जिल्हा परिषद शाळेतील हा व्हिडीओ आहे. झेडपी शाळेतील शिक्षकांवर कुणाचाच वचक नसल्याचं अधोरेखित करतोय. दारु पिऊन शाळेच्या वर्गात विद्यार्थ्यांसमोरच विचित्र अवस्थेत झोपी गेलेल्या या शिक्षकावर कारवाई करण्याचीही मागणी केली जात आहे.

वाचा: 36 तासांनंतर येतोय बुध गुरुसोबत म्हणजेच ‘संसप्तक योग’, जाणून घ्या तुमच्या राशीवर काय होणार परिणाम

काय आहे त्या व्हिडीओमध्ये ?

ह्या व्हायरल व्हिडीओमध्ये एक शिक्षक वर्गात झोपलेला आहे. त्याचे पाय हे टेबलावर आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या शिक्षिकाला कशाचच भान नाहीये. त्यामुळे वर्गातील विद्यार्थीही वर्गाबाहेर गेलेत. वर्गातले सरच दारु पिऊन आल्यामुळे विद्यार्थीही गोंधळून गेले होते. अशातच एक इसम मोबाईलमध्ये व्हिडीओ काढत त्या शिक्षिकाला जागं करतो. त्याला प्रश्न विचारतो. त्यानंतर हा शिक्षक वर्गातून हलत-डुलतच बाहेर जातो. धक्कादायक बाब म्हणजे या शिक्षिकाने चक्क जीन्समध्येच लघुशंकाही केलेली असते. विद्यार्थ्यांनाही याबाबत विचारणा केली जाते. तर त्यांनी सांगितले की सकाळी सर दारु पिउनच आले होते, असा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. असं पहिल्यांच सरांनी केलं असल्याचंही विद्यार्थ्यी सांगितल आहे. दरम्यान, व्हिडीओ काढणारा व्यक्ती या गुरुजींना फैलावर घेत त्यांना असं वागणं शोभतं का, असे सवाल करताना देखील दिसून आला आहे.

वाचा: मुंबईत पुन्हा होणार 26/11 ची पुनरावृत्ती? जाणून घ्या कशामुळे उडालीय खळबळ

कोण आहेत हे गुरुजी?

तर मग दारु पिऊन शाळेच्या वर्गात झोपी गेलेल्या या गुरुजींचं नाव पृथ्वीराज चव्हाण असं आहे. ते धारणी तालुक्यातील काकरमल येथील जिल्हा परिषद शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गावातील उपसरपंच आणि पालकांच्या निदर्शनास हे प्रकरण आल्यानंतर त्यांनी संबंधिक अधिकाऱ्यांकडे या मद्यधुंद शिक्षकाबाबत जाब विचारला आहे. आता अखेर चौकशीअंती या शिक्षकावर काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचंय आहे. मात्र मद्यधुंद अवस्थेत शाळेत येण्याची हिंमत या शिक्षकाची कशी झाली, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांनाच शिस्त लावण्याची गरज असल्याची गरज या घटनेमुळे व्यक्त केली जात आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : Now, if the teachers start coming to school drunk, then the future of the school children is at risk, see what happens in the video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button