ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
शासन निर्णय

मोठी बातमी..आता सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र सरकारचे नाव ! शेतसारा न भरल्यास राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय.. जाणून घ्या खाली सविस्तर माहिती…

राज्य सरकारने घेतलेल्या या मोठ्या निर्णयाचे नुसार ज्या खातेदारांनी शेतसारा नाही भरला त्यांच्या सातबाऱ्यावर महाराष्ट्र शासनाचे नाव येणार आहे .निफाड तालुक्यात याबाबतच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील शेतजमीन खातेदारांना वेळोवेळी नोटिसा पाठवूनही त्यांनी शेतसारा अनधिकृत बिनशेती दंड भरलेला नाही. अशा खातेदारांच्या सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम १७९ अन्वये ‘महाराष्ट्र शासन’ असे नाव लावण्याची कारवाई करण्याचे आदेश निफाड तहसीलदार शरद घोरपडे यांनी तालुक्यातील तलाठी कार्यालयांना दिले आहेत.

तहसीलदार घोरपडे यांनी याबाबत पक्की कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे . शेतजमीन खातेदारांना वेळोवेळी सांगूनही त्यांनी थकबाकी रक्कम भरलेली नाही व त्यामुळे हे पाऊल उचलावे लागले आहे.

शेत्सरा चा नियम काय सांगतो…
सर्व खातेदारांना वेळेत वसुली करणे गरजेचे आहे. नियमानुसार शेतकऱ्याला ही रक्कम देण्यासाठी वेळ दिला जातो पण तरीही जर वेळेत शेतसारा भरला नाही तर कडक कारवाई केली जाते.या कारवाईला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९९६ कलम १७६ ते १८२ अन्वये कायदेशीर असा आधार आहे. नोटीस देऊन सुद्धा जर वसुली नाही झाली तर त्या जमिनीवर महाराष्ट्र शासनाचे नाव लागते.यानंतरही जर शेतकऱ्यांनी कर अदा केला नाही तर सदर मालमत्तेचा जाहीर लिलाव केला जात असल्याचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी सांगितले आहे.

खातेदारांना आवाहन…
शेतसारा बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ महसूल भरावा, असे आवाहन तलाठी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. मात्र, अद्याप जे शेतसारा भरणार नाही, अशा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ‘महाराष्ट्र शासन’ असे नाव नोंदविण्यात येणार आहे. काही ठिकाणी ‘महाराष्ट्र शासन’ हे नाव सातबऱ्यावर चढविण्यात आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही रक्कम देण्यात यावी असे आवाहन केलं जात आहे.

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button