ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Onion Rate | कांद्याच्या दरात घसरण: शेतकऱ्यांची वाढती चिंता, 10000 रुपयांमध्ये 93 पिशव्या!

Onion Rate |सोलापूर: राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकटाचे सावळे आहे. कांद्याच्या दरात झालेली मोठी घसरण शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी बनली आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ येथील शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांची आहे.

चव्हाण यांनी 93 पिशव्या कांदा बाजारात विकला. मात्र, या कांद्याची पट्टी फक्त 10,000 रुपये इतकी मिळाली. याचा अर्थ, प्रतिकिलो कांद्याला त्यांना 1 ते 6 रुपये इतकाच दर मिळाला.

मतदानानंतर दर मेंटेन झाला नाही!

मतदान झाल्यानंतर कांदा भरायला सुरुवात झाली आणि 8 तारखेला रात्री चव्हाण यांनी आपला कांदा बाजारात विक्रीसाठी आणला. 9 तारखेला झालेल्या लिलावात त्यांच्या कांद्याला 1 ते 6 रुपये प्रतिकिलो दर मिळाला.

एक नंबरच्या कांद्याला 625 रुपये!

चव्हाण यांच्यानुसार, चांगल्या प्रतीच्या एक नंबरच्या कांद्याला 625 रुपये प्रतिक्विंटल तर दोन नंबरच्या कांद्याला 300 रुपये, तीन नंबरच्या कांद्याला 200 रुपये आणि चार नंबरच्या कांद्याला 100 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

वादळात नुकसान, आता दरात घसरण!

पहिल्याच वादळामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले होते आणि आता दरात घसरण झाल्याने चव्हाण यांना मोठा फटका बसला आहे.

शासनाकडून मदत गरजेची!

दुष्काळ, पाण्याची टंचाई, ऊन अशा प्रतिकूल परिस्थितीत 60 हजार रुपये खर्च करून जगवलेला कांदा 10,000 रुपयांमध्ये विकला गेल्याने चव्हाण हताश झाले आहेत.

शेतकऱ्यांची मागणी:

  • प्रतिक्विंटल 1000 रुपये अनुदान द्या
  • कांद्याच्या निर्यातीवर बंदी घाला
  • शेतकऱ्यांना मदत करा

शेतकऱ्यांच्या या परिस्थितीकडे सरकार लक्ष देईल का? या प्रश्नाचे उत्तर मिळणे बाकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button