ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Milk Rate | दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका! दूध खरेदी दरात ‘इतक्या’ रुपयांची कपात, जाणून घ्या किती मिळणार भाव?

Milk Rate | भारतातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात करत असतात. परंतू, अनेकदा शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय करत असताना अनेक अडचणी निर्माण होतात. आता राज्यातील दुधाचे खरेदी दर (Milk Rate) कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. चला तर मग दूध खरेदी दरात (Today’s Milk Rates) किती रुपयांची कपात केली आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दुधाचे खरेदी दर कमी करण्याचा निर्णय

नुकताच आता राज्यामधील दूध संघांकडून दुधाचे खरेदी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. दूध उत्पादक संघांनी दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांनी कपात केली आहे. दुधापासून तयार होणारे पदार्थ दूध पावडर, बटर, लोणी इत्यादींचे दर 2 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. मागील सहा महिन्यांमध्ये दुधाचे उत्पादन आणि मागणी यामध्ये तफावत

किती होतील दुधाचे खरेदी दर?

दूध पावडर, बटर, लोण्याचे दर कमी झाल्यामुळे 1 जूनपासून गाय दूध खरेदी दरात 2 रुपयांची कपात करण्याचा निर्णय गोकुळ, वारणा, चितळे, भारत डेअरी, राजारामबापू, कोयना, हुतात्मा संघ, थोटे यांनी घेतला आहे. गायीच्या दूध दरात 3.5 फॅट व 8.5 एसएनएफसाठी प्रतिलिटर 2 रुपये कपात करण्यात आलीआहे. याचमुळे आता गायीच्या दुधाचे खरेदी दर 37 रुपयांवरून 35 रुपये झाले आहेत.

गाय दूध विक्री दरातही 2 रुपयांची कपात

दरम्यान, गोकुळकडून खरेदी दरात कपात केल्यानंतर उद्यापासून म्हणजेच सोमवार दिनांक 3 जुलैपासून प्रतिलिटर गाय दूध विक्री दरात देखील 2 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर भारत डेअरी येथे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील सहकारी, खासगी दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघटनेची बैठक झाली आहे.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: Big hit to milk farmers! Reduction of rupees in the purchase price of milk, know how much the price will be?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button