ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Cotton Rate | कापूस उत्पादकांसाठी खुशखबर! कापसाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ; दरात आणखी होणार मोठी वाढ, जाणून घ्या किती?

Cotton Rate | महाराष्ट्रात कापूस हे दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे नगदी पीक आहे. विदर्भात कापूस पिकाला आवश्यक मृदा आणि वातावरण असल्यामुळे या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणत कापसाचे उत्पादन घेतात. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये कापसाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. परंतु, मागच्या काही महिन्यांपासून कापसाचे दर (Today’s Cotton Price) कमी झाले होते. परंतु पुन्हा आता कापसाच्या दरामध्ये (Cotton Rate) वाढ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात कापसाच्या दरात किती रुपयांची वाढ झाली आहे.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

किती रुपयांची झाली?

कालपासून अनेक बाजारपेठांमध्ये कापसाच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता कापसाचे दर 100 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक दिलासा मिळणारं आहे. तर वायद्यांमधील वाढ ही 1 हजार 240 रुपये इतकी आहे. हा कापसाचा बाजार भाव हमीभावापेक्षा अधिक आहे. मागील दोन महिन्यांपासून कापूस दरवाढाची मागणी केली जात होती. तसेच दरवाढीचे वायदेही केले जात होते.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

कापसाच्या दरात आणखी होणार का वाढ?

मात्र, कालपासून या वायद्यांमध्ये सुधारणा दिसत आहे. त्यामुळे आता कापूस दरवाढीचा परिणाम काही बाजार समित्यांवर देखील दिसत आहे. भारतात कापसाचे उत्पादन जास्त असल्यामुळे याचा दबाव त्याच्या दरावर होत आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये कापसाची होणारी आवक कमी झाल्यास कापसाचे दरात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याचा अंदाज कापूस अभ्यासाकांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: Good news for cotton growers! Increase in cotton price by There will be a big increase in the rate, know how much?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button