ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Ajit Pawar | बिग ब्रेकींग! अजित पवार बनणार राज्याचे उपमुख्यमंत्री? 30 आमदारांसह पवार राज्य सरकारमध्ये होणार शामील…

Ajit Pawar | महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. राष्ट्रवादीच्या 30 आमदारांसह अजित पवार राजभवनात पोहोचले आहेत. रविवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्या आमदारांसह राजभवनात पोहोचल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी बंडखोरी केली असून, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याची बाब समोर आली आहे. अजित पवार (Ajit Pawar) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. त्यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचेही वृत्त आहे.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या अनेक आमदारांनाही शिंदे मंत्रिमंडळात मंत्री केले जाऊ शकते. अजित पवार राजभवनात पोहोचले असून, ते राज्यपालांची भेट घेणार आहेत. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी अजित पवार यांच्या मतभेदाच्या बातम्या समोर आल्या होत्या. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी संघटना सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. दुसरीकडे, ताज्या अपडेटनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही राजभवनात पोहोचले आहेत.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: Big Breaking! Ajit Pawar will become the Deputy Chief Minister of the state? Pawar will join the state government along with 30 MLAs…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button