ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Milk Rates | अर्रर्र..! दुधाच्या दरात थेट 8 रुपयांची घसरण; पशुपालक शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट

Milk Rates | शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय (Milk Prices Today) करतात. जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. येथील नागरिकांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे. शेतीला जोडधंदा म्हणून केल्या जाणाऱ्या दुग्धव्यवसायातून (Milk Rates) अट शेतकऱ्यांना फायदा मिळेनासा झाला आहे. ज्याचं कारण म्हणजे आता दुधाचे दर (Milk Rates) कमी होताना दिसून येत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात दुधाच्या दरात किती रुपयांची घट झाली आहे.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

दुधाच्या दरात मोठी घट


तर शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून दुधाला प्रतिलिटर 38 रुपये दर मिळत होता. मात्र, गेल्या दोन महिन्यात दुधाचे (Todays Milk Rate) खरेदी दर टप्याटप्याने कमी होताना दिसून येत आहे. तर दुधाचे हे दर 8 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. खरं तर, उन्हाळ्यात चारा कमी झाल्याने परिणामी दुधाचे उत्पादन (Milk Production) ही घटल्याने दुधाच्या दरात वाढ होते. परंतु यंदा हे चक्र उलटे फिरले आणि दुधाच्या खरेदी दरात घट झाली.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

दूध उत्पादनातही झाली घट


यंदा दुधाच्या उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ज्याचं कारण यंदा उन्हाचा चांगलाच चटका भासत होता. परिणामी उष्णतेमुळे जनावरांच्या दुधात देखील थेट 10 टक्क्यांनी घट झाली आहे. अशातच जनावरांच्या खाद्यात देखील मोठी वाढ झाली आहे. गोळीपेंड 50 किलोला 250 रुपयांपर्यत वाढ झाली आहे. त्यामुळे आता पशुपालकांना दुग्धव्यवसाय परवडणेसा झाला आहे.

Web Title: Arrrr..! Direct fall in milk price by Rs.8; A big financial crisis on cattle rearing farmers

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button