ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Agricultural Advisory | शेतकऱ्यांनो कधी पडणार पाऊस? अन् कधी करावी पेरणी? जाणून घ्या तज्ञांचा हवामान आधारित कृषी सल्ला

Agricultural Advisory | भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार,
पुढील पाच दिवस दिनांक 21 ते 25 जून 2023 दरम्यान आकाश आंशिक ते अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक 21 व 22 रोजी हवामान (Agricultural Advisory) कोरडे राहण्याची अधिक शक्यता आहे. दिनांक 23 व 24 जून 2023 रोजी काही
ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. चला तर मग हवामान आधारीत कृषी सल्ला (Agricultural Advisory) जाणून घेऊयात.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

कृषी सल्ला

शेतकरी बांधवांनी 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. मध्यम व विस्तारित स्वरूपाचा
पावसाचा अंदाज लक्षात घेता जमीन मशागतीची कामे (वखरणी, शेणखत देणे इत्यादी.)पुढील 2 ते 3 दिवसामध्ये
उरकून घेण्यास प्राधान्य द्यावे. वाढत्या तापमानाचा व उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज लक्षात घेता, शेतीमधील
महत्वाची कामे हि सकाळी 11 वाजता पूर्वी करण्यास प्राधान्य द्यावे.

जनावरांची काळजी

पाऊस, वादळी वारा व विजांचा कडकडाट
होण्याची शक्यता लक्षात घेता गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्याव इतर पाळीव जनावरे मोकळ्या जागेत चरावयास
सोडण्याचे टाळावे. जनावरे हे खुल्या पाण्याचे स्त्रोत, नदी किंवा तलाव व ट्रक्टर व इतरधातूच्या अवजारांपासून दूर
ठेवावे.

पाऊस, वादळी वारा व विजांचा कडकडाट
होण्याची शक्यता लक्षात घेता गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्याव इतर पाळीव जनावरे मोकळ्या जागेत चरावयास
सोडण्याचे टाळावे. जनावरे हे खुल्या पाण्याचे स्त्रोत, नदी किंवा तलाव व ट्रक्टर व इतरधातूच्या अवजारांपासून दूर
ठेवावे.

फळभाज्या आणि भाजीपाल्याची कशी घ्याल काळजी?

वाऱ्याचा वेग लक्षात घेता फळबागा व भाजीपाला पिकांना बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा. पावसाळ्यात
शेतातील पाणी जागेवरच मुरविण्यासाठी तसेच अवघावासोबत मौल्यवान मातीचा थर वाहून जाऊ नये म्हणून
जमिनीची मशागत (नांगरणी, वखरणी) करताना मुख्य उतारला आडवी किंवा समतल रेषा काढून या रेषेला
समांतर करावी.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

बियाणे खरेदी करताना घ्या काळजी

शेतकरी बांधवांनी शिफारशीतील बियाणे व बीजप्रक्रियेसाठी साठी लागणारी बुरशीनाशके आणि
जीवाणू खताची उपलब्धतता करून ठेवावी. शेतकरी बांधवांनी बियाणे खरेदी करताना टॅग/लेबल वरील संपूर्ण माहिती जसे की,पिकाचे नाव, वाण/जात, उगवणशक्ती, भौतिक व अनुवांशिक शुद्धता टक्केवारी, निव्वळ वजन,
बियाणे चाचणी, तारीख, महिना व वर्ष, बीज प्रक्रियेला वापरलेले रसायन, तसेच विक्रेत्याचे नाव व पत्ता इत्यादि
माहिती तपासून घ्यावी. बियाणे विक्रेत्याकडून खरेदी केलेल्या बियाण्याची पक्की पावती/बिल घ्यावे, त्यावर विक्रेता
आणि खरेदी करणारे शेतकरी यांची स्वाक्षरी असल्याची खात्री करावी.

Web Title: Farmers, when will it rain? And when to sow? Learn climate-based agriculture advice from experts

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button