Banana Crop Insurance | केळी पिक विमा मागणीसाठी शेतकऱ्यांचा लढा यशस्वी, ‘या’ 18 मागण्या केल्या मान्य
Banana Crop Insurance | Farmers' fight for banana crop insurance demand successful, 'these' 18 demands accepted
Banana Crop Insurance | जळगाव जिल्ह्यातील केळी पिक विमा (Banana Crop Insurance) मागणीसाठी शेतकऱ्यांनी गेल्या महिन्याभरात तीन वेळा आंदोलन केले होते. या आंदोलनाला यश आले आहे आणि शेतकऱ्यांच्या 18 मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. 2 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर 14 फेब्रुवारीला बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
बैठकीत 20 मुद्यांवर चर्चा झाली. रावेर, यावल, मुक्ताईनगर आणि चोपडा या तालुक्यातील 7 हजार 981 अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांपैकी 5 हजार 335 शेतकऱ्यांनी अपील केले होते. त्या शेतकऱ्यांच्या पीक पॉलिसी पात्र ठरविण्यात आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या पीक पॉलिसी प्रलंबित आणि पात्र आहेत त्यांना राज्य सरकारकडून सबसिडी उपलब्ध झाली की विम्याचे परतावे देण्यात येतील, असे ठोस आश्वासन देण्यात आले आहे.
2021-2022 मध्ये चार हेक्टरवर पीक विमा उतरवलेल्या 349 शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळतील, असे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले. जिल्ह्यातील 10 हजार 619 नामंजूर प्रकरणांची फेरतपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घातले आहे.
वाचा | Crop Insurance | ५२ लाख शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाई मंजूर, तरीही २.५ लाखांना अद्याप रक्कम नाही!
जिल्ह्यातील 81 हजार 642 हेक्टर क्षेत्रांसाठी पीक विमा काढलेल्या 77 हजार 920 शेतकऱ्यांपैकी 54 हजारांवर शेतकऱ्यांचे प्रस्ताव पात्र ठरले. त्यांच्यासाठी 33 कोटींवर निधी मंजूर झाला. कृषी आयुक्तालयाने प्रस्ताव नाकारलेल्या आणि वस्तुनिष्ठ पुरावे सादर केलेल्या 7 हजार 191 शेतकऱ्यांबाबत पुन्हा अर्जासोबत वस्तुनिष्ठ पुरावे कृषी विभागात सात दिवसांच्या आत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला पीक विम्याची रक्कम मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली. हे यश शेतकऱ्यांच्या संघटित लढ्याचे आणि आंदोलनाचे आहे.
Web Title | Banana Crop Insurance | Farmers’ fight for banana crop insurance demand successful, ‘these’ 18 demands accepted
हेही वाचा