ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

Hot Water | गरम पाणी पिताय तर सावधान ! शरीराचे होऊ शकते गंभीर नुकसान

Hot Water |वजन कमी करण्यासाठी किंवा आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी लोक गरम पाणी (Hot Water) पितात. तसेच घशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी देखील गरम पाण्याचे सेवन केले जाते. खरंतर गरम पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत मात्र ते म्हणतात ना, ‘अति तेथे माती’. त्याचप्रमाणे जास्त गरम पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक असते.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

अति गरम पाणी पिल्याने होणारे तोटे

झोपेची समस्या : रात्री झोपताना गरम पाणी पिले तर झोप (Sleep) लागताना भरपूर त्रास होतो. तसेच सतत लघवीला जावे लागते.

किडनीवर वाईट परिणाम : जास्त गरम पाणी पिण्याचा आपल्या किडनीच्या आरोग्यावर चुकीचा होतो. एका संशोधनानुसार, जास्त गरम पाणी प्यायल्याने किडनीच्या (Kidney) कार्यात अडथळा निर्माण होतो. तसेच किडनीवर जास्त दबाव येतो.

शरीराच्या अवयवांचे नुकसान : अति गरम पाणी पिण्याचा शरीराच्या अंतर्गत अवयवांवर वाईट परिणाम होतो. यामुळे शरीरात अंतर्गत अवयव जळण्याची शक्यता वाढते. शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या (Internal Body Parts) ऊती अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांच्यावर फोड येण्याचा धोका असू शकतो.

नसांना सूज येणे : जर आपण अति गरम पाणी पिले तर आपल्या मेंदूच्या नसांना सूज येऊ शकते. तसेच डोके सुद्धा दुखू शकते.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

अन्ननलिकेचे नुकसान होते : गरम पाणी पिल्याने आपल्या अन्ननलिकेवर जास्त परिणाम होतो. तोंड आणि पोट अन्ननलिकेने जोडले जातात. अशात गरम पाणी प्यायल्याने या अन्ननलिकेतून दाणे बाहेर पडू लागतात. याबरोबरच त्यात जळजळही सुरू होते. ही वेदना जास्त वेळ राहते.

कोमट पाणी प्या.

शरीराचे नुकसान टाळण्यासाठी दिवसातून फक्त तीन ते चार ग्लास कोमट पाणी प्या. महत्त्वाची बाब म्हणजे जेवण झाल्यानंतरच गरम पाणी प्या. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते व तुम्ही निरोगी राहता.

Hot water is dangerous for health

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button