ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Grocery Prices | कांदेपोहे, आटा, रवा आणि मैद्याचे दर वाढले तर खाद्यतेलाच्या दरातील घसरणही थांबली

Grocery Prices| बाजारात काही महिन्यांपासून मिलबर गव्हाच्या (Milbar Wheat) दरात वाढ सुरुच आहे. गेल्या आठवड्यात या गव्हाच्या दरात आणखी आणखी शंभर रुपयांची वाढ झाली. याचाच परिणाम म्हणून आता आटा, रवा आणि मैद्याच्या दरातसुद्धा ५० किलोच्या पोत्यामागे आणखी ५० ते ६० रुपयांनी वाढ झाली आहे.

एवढंच नाही तर भातामध्ये (Rice) झालेल्या दरवाढीमुळे कांदेपोह्यांचे दर देखील वाढले आहेत. सध्या खाद्यतेलांमधील घसरण थांबली आहे. मात्र आवक-जावक साधारण असल्याने साखर, गूळ, डाळी आणि इतर अन्नधान्याचे दर स्थिर होते. त्यात महिना अखेरमुळे बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी आहे. यामुळे उलाढाल बऱ्यापैकी मंदावली आहे.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

मिलबर गव्हाच्या दारात सातत्याने वाढ

आटा, रवा आणि मैदा तयार करण्यासाठी मुख्यतः मिलबर गहू वापरला जातो. मात्र अन्न महामंडळाकडून आटा, रवा आणि मैदा तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या मिलबर गव्हाचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नाही. अन्न महामंडळाच्या गोदामात गव्हाचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. पण तरीसुद्धा विक्री अतिशय कमी प्रमाणात सुरू आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून मिलबर गव्हाचे दर सातत्याने वाढत आहेत.

खाद्यतेलांमधील घसरण थांबली

मागील आठवडयात खाद्यतेलांमधील घसरण थांबली होती. सोयाबीन आणि मोहरीचे दर किमान आधारभूत किमतीपेक्षाही खाली आले आहेत. यामुळे शेतकरी आपला माल विकताना हात आखडता घेत आहेत. अशातच यंदा मॉनसून उशिरा येणार म्हणून मॉन्सून कमी असेल, असे अंदाज व्यक्त होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची मनोवृत्ती बदलू लागली आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त घसरण

सध्या सर्वच खाद्यतेलांचे दर मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. दि. १९ मेला मुंबई बंदरातील पामतेलाचा प्रती टनाचा दर ५० टक्क्यांनी घटून ९२५ डॉलरपर्यंत आला होता. तर मागील वर्षी हा दर १८४० डॉलर एवढा होता. तसेच कच्च्या सूर्यफूल तेलाच्या दरात ४७ टक्क्यांनी, तर सोयाबीन तेलाच्या दरात ५६ टक्क्यांनी घट होऊन हे दर अनुक्रमे ९९० आणि ९५० डॉलर्सपर्यंत घसरले होते.

Hike in prices of Grocery material

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button