ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Update | महाराष्ट्रात विजांसह अवकाळी पाऊस कोसळणार ; ‘या’ जिल्ह्यांत बरसणार सरी

Weather Update |राज्यातील शेतकरी मान्सूनकडे डोळे लावून बसले आहेत. अशातच राज्यामध्ये अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने सांगितला आहे. या अंदाजानुसार राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) बरसणार आहे. येत्या 31 मेपर्यंत हा अवकाळी पाऊस येईल.

उकाड्यापासून दिलासा मिळणार

दरम्यान राज्यातील बहुतांश शहरांचा कमाल तापमानाचा पारा अगदी चाळी अंशांपर्यंत घसरला आहे. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. तसेच हवामान विभागाकडून मान्सूनबाबतही दिलासादायक माहिती समोर आली आहे. मान्सूनची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण असल्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये पाऊस अंदमान, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व्यापणार आहे.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

म्हणून अवकाळी पाऊस पडणार

सध्या राजस्थान ते मध्य प्रदेशपर्यंत चक्रिय स्थिती तयार झाली आहे. त्याचवेळी दक्षिण भारताकडून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे वाहत आहेत. या परिस्थितीमुळे राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण भारतातील काही भागात सुद्धा पाऊस हजेरी लावणार आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

या जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस

राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद याठिकाणी आज विजांसह पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. तसेच ४ जूनच्या सुमारास मान्सून केरळमध्ये दाखल होईल. १ जूनपूर्वी मान्सूनचे आगमन होईल अशी अपेक्षा नाही.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

यंदाच्या वर्षी असणार सामान्य मान्सून

यंदाच्या वर्षी मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. यामुळे पाऊस देखील सर्वसामन्य राहील. राज्यात अति मुसळधार किंवा पूरजन्य परिस्थिती निर्माण होईल असे सध्यातरी वाटत नाही. जून ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या काळात भारतात दीर्घकालीन सरासरीच्या ९६ टक्के पर्जन्यमान अपेक्षित आहे.

Todays weather updates of maharashtra

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button