ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
PM KISANकृषी बातम्या

PM Kisan | अखेर शेतकऱ्यांच्या प्रतिक्षेला पूर्णविराम! आज होणार 13वा हप्ता खात्यात जमा, जाणून घ्या तुम्हाला मिळणार का?

PM Kisan | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan) लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दुपारी 3 वाजता कर्नाटकमध्ये पीएम किसानचा 13 वा हप्ता जारी करतील. यादरम्यान पीएम मोदी (PM Kisan) शेतकऱ्यांशी थेट संवाद साधतील आणि त्यांना आर्थिक (Financial) उत्पन्न वाढवण्याचे गुण शिकवतील. यावेळी पीएम मोदी 16 हजार कोटींहून अधिक रक्कम जारी करतील आणि 2000 रुपयांचा 13वा हप्ता 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या (Agriculture) खात्यात पोहोचेल.

वाचा:आता पिकांसाठी खतचं ठरतंय वरदान! शेतकऱ्यांनो एका क्लिकवर त्वरित जाणून घ्या खतांचे नवीतम दर

शेतकरी हप्त्याच्या प्रतीक्षेत
शेतकरी बांधव बऱ्याच दिवसांपासून पीएम किसानच्या 13व्या हप्त्याची वाट पाहत होते. केंद्र सरकार होळीपूर्वी पीएम किसानचा 13 वा हप्ता जारी करणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या. अशा परिस्थितीत होळीपूर्वी 13वा हप्ता जाहीर करून पीएम मोदी शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहेत.

पीएम किसानचा 12वा हप्ता
पीएम मोदींनी गेल्या वर्षी 17 ऑक्टोबर रोजी पीएम किसानचा 12 वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर 8 कोटी शेतकऱ्यांनी 12 व्या हप्त्याचा लाभ घेतला होता. यासाठी केंद्र सरकारला 16 हजार कोटी रुपये खर्च करावे लागले. मात्र, या काळात लाखो अपात्र शेतकऱ्यांनी फसवणूक करून बाराव्या हप्त्याचा लाभ घेतला होता.

आज करणार 13वा हप्ता जारी
पीएम मोदी आज पीएम किसानच्या 13 व्या हप्त्यासाठी 16,800 कोटी रुपये जारी करणार आहेत. याचा फायदा 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. या वृत्ताने शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. पीएम मोदी कर्नाटकातील बेळगावी येथून 13 वा हप्ता जारी करतील. मात्र, जर संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता तसेच ई-केवायसी केली असेल, तरच तुम्हाला हा 13 वा हप्ता मिळू शकतो. अन्यथा तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहू शकता.

वाचाबातमी कामाची! आता दुग्ध व्यवसायातून मिळणार लाखोंचा नफा, ‘या’ योजनांतर्गत मिळतंय आर्थिक सहाय्य

काय आहे योजना
पीएम किसान ही केंद्रीय योजना आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये देते. विशेष बाब म्हणजे ही 6000 रुपयांची रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो. पीएम किसानसाठी केंद्र सरकारने आतापर्यंत 2 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे.

हेही वाचा:

Web Title: Finally, the farmers’ wait is over! The 13th installment will be deposited in the account today, know whether you will get it?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button