ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Mosambi Farming | मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत ! पिकावर आलेला रोग आणि शासनाकडून न मिळणारा पीकविमा यामुळे शेतकरी हतबल

Mosambi Farming |बीडमधील (Beed) मोसंबी उत्पादक सध्या चिंतेत आहे. झाडांवर आलेल्या रोगामुळे येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. याठिकाणी लागवडीनंतर मोसंबीच्या झाडांना फळधारणा झाली आहे. मात्र फळाची व्यवस्थित वाढ झालेली नाही. अशातच आता रोगामुळे फळांची मोठ्या प्रमाणात गळ होऊ लागली आहे.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

शेतकऱ्यांनी बागांवर फिरवली कुऱ्हाड

यावर विविध उपाययोजना करुनही फरक पडत नसल्याने आणि सोबतीला विम्याचे कवचसुद्धा नसल्याने शेतकऱ्यांच्या मोसंबीच्या बागा (Mosambi Farms) खराब होत आहेत. यामुळे बीड मधील शेतकरी मोठ्या क्षेत्रातील बागांवर कुऱ्हाड चालवताना पहायला मिळत आहेत.

मोसंबीला भाव नाही

याआधी देखील मोसंबींच्या बागांवर रोगराई येऊन कीड आली होती. मात्र त्यावेळी महागडी औषध फवारणी करून कीड रोगाचा प्रतिबंध करणे शक्य होते. पण आता किडीवर प्रतिबंध आणणे अवघड झाले आहे. त्यात मोसंबीला भाव मिळत नाही आणि विम्याचे कवच सुद्धा नाही. यामुळे शेतकऱ्यांनी मोसंबीच्या शेतीपासून फारकत घ्यायला सुरूवात केली आहे.

पाच एकराच्या बागेत फिरवला ट्रॅक्टर

तीन वर्षांपूर्वी तलवाडा गावच्या अकरम शेख यांची पाच एकरामध्ये मोसंबीच्या बागेची लागवड केली होती. यासाठी त्यांचा सहा लाख रुपये खर्च झाला मात्र यातून काहीच उत्पन्न मिळत न्हवते. त्यामुळे त्यांनी या संपूर्ण पाच एकरच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवला आहे. मोसंबी बागेवर पडत असलेले नवनवीन रोग आणि शासनाकडून मिळत नसलेला पिक विमा त्यामुळे ही बाग जोपासायची कशी ? यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

दहा एकरावरच्या मोसंबीवर कुऱ्हाड

राहेरी गावच्या कृष्णा लाड यांनी एका वर्षात दहा एकरावरची मोसंबी तोडून बांधावर टाकली आहे. उच्च दर्जाच्या मोसंबीच्या रोपाची त्यांनी लागवड केली होती. त्यासाठी ठिबकची व्यवस्था केली जाणार आणि यातून 15 ते 16 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांना होती. मात्र अचानक मोसंबी पिवळी पडू लागली. पदरचा खर्च करून बाग जोपासायची कशी त्यामुळे त्यांनी दहा एकरावरच्या मोसंबीवर कुऱ्हाड चालवली.

मागील तीन वर्षापासून मोसंबी फळबागाला शासनाकडून कुठल्याच प्रकारचा पिक विमा मिळत नाही. एवढेच नाही तर बागेचे नुकसान झाल्यावर नुकसान भरपाई देखील मिळत नाही. यामुळे काही शेतकऱ्यांनी नव्याने लागवड केलेल्या बागा देखील तोडायला सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे फळांवर पडणारा काळ्या डागाचा रोग आणि झाडे पिवळी पडत असल्याने यावर कुठल्याही औषधाचा परिणाम होताना दिसत नाही. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या मोसंबीच्या बागा तोडण्याच्या तयारीत शेतकरी आहेत.

Farmers get tensed due to diseases on mosambi farm

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button