ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Red Kandhari Cow | मराठवाड्याची शान, लाल कंधारी गाय! 1100 ते 1200 लिटर देते दूध

Red Kandhari Cow | मराठवाडा हा प्रदेश आपल्या समृद्ध संस्कृतीसाठी आणि वारशा साठी प्रसिद्ध आहे. आणि याच वारशाचा एक अविभाज्य भाग म्हणजे लाल कंधारी गाय (Red Kandhari Cow).

कंधार या भागातून उगम पावलेली ही गाय, मराठवाड्यात विशेष महत्त्वाची मानली जाते. आपल्या दुग्ध उत्पादन क्षमता (Milk production capacity), शक्तिशाली बैल आणि कठोर परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता यांसाठी लाल कंधारी गाय प्रसिद्ध आहे.

वाचा :Protection From Mosquito | डासांचा त्रास कमी करण्यासाठी मरवा वनस्पती!

वैशिष्ट्ये:

  • रंग: पूर्ण लाल रंगाची
  • शरीराची रचना: मध्यम आकाराचे मस्तक, लांबट आणि काळे डोळे, आकर्षक आणि वयानुसार काळसर होणारा वशिंड, गोलाकार आणि गुलाबी रंगाची चमकदार कातडी असलेला कास
  • दुग्ध उत्पादन: एका वेताचे सरासरी दूध उत्पादन ६५० ते ११०० किलो (खाद्य नियोजनानुसार वाढ शकते)
  • उपयोग: दूध उत्पादन (milk production), शेतीकाम (farming), वाहतूक, बैलगाडा शर्यत

लाल कंधारी गाईचे फायदे:

  • दुधाची चांगली गुणवत्ता: ३ ते ४.५% स्निग्धांश असलेले दूध
  • कठोर परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता: कोरडे हवामान (dry weather) आणि दुष्काळातही (drought) चांगली वाढ
  • शक्तिशाली बैल: शेतीकाम, वाहतूक आणि बैलगाडा शर्यतीसाठी उपयुक्त

हे ही वाचा:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता केवळ ५ मिनिटांत मिळणार कृषी कर्ज, जाणून घ्या कसं…

लाल कंधारी गाय: मराठवाड्याची शान आणि शेतकऱ्यांचा आधारस्तंभ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button