ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Electricity | आनंदाची बातमी ! शेतीसाठी दिवसा बारा तास वीज मिळणार ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Electricity | शेतीसाठी भरपूर प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. सध्या उन्हाळ्यामुळे तर पिकांना वेळेत पाणी द्यावे लागते. मात्र ऐन उन्हाळ्यात शेतीला पाण्याची गरज असताना वीज पुरवठा (Electricity) खंडीत झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. कारण पाण्याशिवाय पीक जळून जाण्याचा धोका निर्माण होतो.

शेतीसाठी दिवसा बारा तास वीज मिळणार

या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शेतीसाठीच्या वीजपुरवठ्याबाबत मोठी घोषणा केली आहे. येथून पुढे शेतीसाठी दिवसा १२ तास अखंडीत वीज देऊ, असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. काल (ता.२५) सोलापूरमध्ये भाजपा सोलापूर शहर व ग्रामीण जिल्हा संकल्प महाविजय कार्यकर्ता संमेलनात उपमुख्यमंत्री बोलत होते.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

सोलर फिडरसाठी खासगी जमीन घेणार

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ” राज्यामध्ये मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी ही क्रांतीकारी योजना आणली आहे. यामध्ये कृषीवाहिन्या सोलरवर कार्यन्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा १२ तास अखंडीत वीज देणार मिळणार आहे. यामधील दुसरे क्रांतीकारी पाऊल म्हणजे सोलर फीडर तयार करण्यासाठी सरकारी जमीन नसेल, तर सरकार शेतकऱ्यांची खासगी पडीक जमीन ३० वर्षांसाठी भाडेतत्वावर घेणार आहे. “

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

नरेंद्र मोदी यांनी परिवर्तनाची लढाई लढली

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत त्यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांना धारेवर धरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे राजकारण मोडीत काढण्याचं काम केले आहे. सामाजिक-आर्थिक परिवर्तनाची लढाई देशाचा पंतप्रधान म्हणून लढली जाऊ शकते आणि सर्वसामान्यांच्या जीवनात परिणामकारक बदल घडवला जाऊ शकतो हे गेल्या ९ वर्षात मोदींनी दाखवून दिलं. त्यामुळे ज्यांची दुकानं बंद होत आहेत ते एकत्र येत आहेत आणि मोदींवर टीका करत आहेत. असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Farmers will get 12 hours electricity in day time

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button