ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
शेती कायदे

शेतकऱ्यांचे हे महत्त्वाचे हक्क तुम्हाला माहीत आहेत का? अवघ्या पाच रुपयांत मिळवता येतो सात-बारा उतारा..

शेतकरी हा जगाचा पोशिंदा समजला जातो. परंतु असे असले तरी बहुतेक शेतकरी सुशिक्षित नसतात. यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते किंवा सरकारी कामात अडवणूक केली जाते. ही अडवणूक होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना शासनाने दिलेले हक्क व सवलतींबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

हे आहेत शेतकऱ्यांचे हक्क

१)सात-बारावर विहीर,पीक पाहणी नोंद करण्यास कसलेही शुल्क आकारले जात नाही.

२)सात- बारा, ८-अ व इतर अधिकार अभिलेख हे सार्वजनिक दस्त असल्याने त्याचे उतारे कोणासही मिळू शकतात. चतुःसीमा / बाकी नसलेला दाखला तलाठ्याकडून त्वरित मोफत मिळतो.

३)सात-बारा व ८-अ खाते उतारा मिळवण्यासाठी एका वर्षासाठी रु.५ भरून सध्या कागदावर अर्ज तलाठ्यास दिल्यास २४ तासांत उतारा देणे बंधनकारक आहे.

४)सदर उतारे रु.२० प्रति उतारा भरून तालुका कार्यालयातून संगणकावर ताबडतोब मिळू शकतात. त्यासाठी एक छोटा छापील अर्ज भरावा लागतो.

५)जमिनीचे आपले संपूर्ण रेकॉर्ड सात-बारा, ८-अ, फेरफार नोंदी, ६-ड उतारे आपल्याकडे मोफत पाहता येतात.

६)तालुका अभिलेख कक्षातील १९२५ ते ३० पासूनचे संपूर्ण रेकॉर्ड विनंतीवरून मोफत पाहता येते. तसेच माहितीच्या अधिकारात तपासता देखील येते.

७)गावचे सर्व सात-बारा www. mahaabhulekh.mumbai.nib.in या साईटवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

८)शेतात जाण्या-येण्यासाठी शेताच्या बांधावरून वापर करण्याचा अधिकार शेतकऱ्याला असतो.वहिवाटीच्या रस्त्यास तसेच बांधावरून जाण्यास अडथळा केल्यास तहसीलदार वाट काढून देऊ शकतात.

९)कलम ८५ महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ प्रमाणे शेतजमिनीचे वाटप तहसीलदारांकडून मोफत होते ; मात्र त्यासाठी सर्व संबंधितांत एकोपा असावा असे प्रतिज्ञापत्र कच्च्या वाटपासहित सादर केल्यास मोफत वाटप करून मिळते.

१०) शेतजमीन खरेदीची नोंद सात-बारा मोफत होते.उपनिबंधकाच्या कार्यालयातून अ-पत्रक व इंडेक्स ।। दर पंधरवड्यास तलाठ्याकडे रवाना होते. त्याचे प्रति शेतकरीही तलाठ्यास देऊन पोच घेऊ शकतात. १५ दिवसांत फेरफार रजिस्टरला नोंद घेऊन, घेणार व विकणार यांना नोटिसा बजावणे हे तलाठयाचे काम असून ते मोफत होते.

११) नोंद झाल्यानंतर सदर नोंदीची सात-बारावर दुरुस्ती होऊन दुरुस्त सातबारा मोफत मिळणे हा शेतकऱ्याचा हक्क आहे.

१२) कोणत्याही जमिनीवर कायदेशीर आधार असल्याशिवाय खातेदाराव्यतिरिक्त इतरांची वहिवाट दाखल होऊ शकत नाही.

१३) वारस नोंदीसाठी मृत्यूपासून तीन महिन्यांच्या आत अर्ज देणे बंधनकारक असते. शक्यतो वारस नोंदी करताना आणेवारी लावून घ्यावी.

१४) शेतजमीनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात शासनाने ठरवलेल्या किमती प्रमाणेच व्यवहार करावा. या किमती पाहण्यासाठी सबरजिस्ट्रार कार्यालयात मोफत उपलब्ध असतात.

१५)शेतजमिनीचे वाटप सर्वांची संमती असल्यास रु.१०० च्या स्टॅम्पवर सबरजिस्ट्रारच्या कार्यालयात नोंदणीकृत होऊ शकते.वाटणी प्रमाणे सात-बारावर नोंद करवून घ्यावी.

हे विशेष लक्षात ठेवा

१) शेतकऱ्यांनी जेथे पाठबंधारे खात्याचे पाणी येते तेथे सहकारी पाणीवापर संस्था स्थापन कराव्यात. ते जास्त फायदेशीर असते.

२) शेतीमाल विक्रीची बिले, दरवर्षीचे ८-अ व सात-बाराचे उतारे,महसूल पावत्या,पत्रव्यवहार, पाटबंधारे खात्याच्या पावत्या, ऊसबिले, ग्रामपंचायतीच्या पावत्या, इतर पावत्या, बाजार समिती बिले, मंजुरी बिले , दूध डेअरी बिले व लाईट बिले अद्ययावत ठेवाव्यात.म्हणजे भविष्यात कोणतीही समस्या उदभवल्यास कायदेशीर व सनदशीर मार्गाने पाठपुरावा करणे सोपे जाते.

३) जमिनीत कुळ असल्यास त्याच्या नावे सात-बारावर व्यवस्थित लिहिले आहे का ते पहावे. अशावेळी जमिनीचा सारा कुळाने भरायचा असतो.

४) तलाठ्याने काढलेली नोटीस कधीही नाकारू नये.तलाठ्यांनी नोटीस बजावल्यास आपले म्हणणे मांडण्याची संधी हुकते.

५) आदीवासींची जमीन कायद्याने घेता येत नाही अथवा पाच वर्षापेक्षा जास्तीचा भाडेपट्टा करता येत नाही याची नोंद घ्यावी.

या काही महत्त्वाच्या गोष्टी व हक्क लक्षात ठेवल्यास शेतकरी स्वतःला आपले नुकसान व अडवणूक होण्यापासून रोखू शकतात. आपल्या हक्कांचे रक्षण आपण स्वतः करणे हे आपले कर्तव्य आहे

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button