ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Update | राज्यात पुढील २४ तासात विजांच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता!

Weather Update | Chance of rain with lightning in next 24 hours in the state!

Weather Update | गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाची संतत हजेरी आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील २४ तास पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावासाचा (Weather Update) इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रातील धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे राजधानी दिल्लीसह, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश यासह अनेक राज्यांना पावासाचा इशारा देण्यात आला आहे.

उन्हाचा तडाखाही वाढला

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाने हजेरी लावली असतानाच राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. यवतमाळ येथे कमाल तापमान ३९.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.

वाचा | Market Rate | जाणून घ्या आजचे ताजे ज्वारी ,कांदा अन तुरीचे ताजे बाजारभाव सविस्तर …

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट

येत्या २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसासह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबईत कसे असेल हवामान?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत अंशत: ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत काही भागात पावसाची शक्यता आहे.

पुढील तीन दिवसांचा अंदाज

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील तीन दिवसांचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

राज्यातील विविध भागांमध्ये पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Web Title | Weather Update | Chance of rain with lightning in next 24 hours in the state!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button