ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather | पुढच्या 4 ते 5 दिवसांत विजांच्या कडकडाटासह होणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Weather | राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस हजेरी जोरदार लावताना दिसत आहे. तसेच अनेक भागांत. अतिवृष्टी झाल्याने शेती (Agriculture) पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इतकचं नाही, तर कित्येक गावे वाहून गेली आहेत. आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (Meteorological Department) पावसाबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 24 तासांत देखील काही भागात पाऊस दाखल होणार आहे. चला तर मग हवामान विभागाने वर्तवलेला पावसाचा अंदाज जाणून घेऊया

वाचा: मोदी सरकारनंतर शिंदे सरकार शेतकऱ्यांसाठी आणणार ‘मुख्यमंत्री किसान योजना’, जाणून घ्या काय होणार फायदा?

कुठे कोसळणार पावसाच्या सरी?
राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. त्याचवेळी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा जोरदार फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात जोरदार आणि विदर्भ आणि मराठवाड्यात देखील हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचवेळी 11 सप्टेंबर रोजी राज्याच्या अनेक किनारीपट्टीवरील भागात पावसाचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे.तर विदर्भात विजांच्या कडकडाटासह 11, 12 आणि 13 सप्टेंबर रोजी सर्वत्र पाऊस होणार आहे.

वाचा: आता घरबसल्या करा लाखोंची कमाई अवघ्या २५ हजारात करा पोह्यांचा व्यवसाय!

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत
जुलै ते ऑगस्ट 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीचा जीआर काढण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना या मदतीचे वितरण येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये होणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली आहे. या शासन निर्णयाअंतर्गत 3 हजार 456 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Heavy rain with lightning in next 4 to 5 days know forecast of Met department

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button