ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Compensation For Damages | मोठी बातमी ! २२ लाख ३४ हजार ९३४ शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची मदत!

Compensation For Damages | Big news! Compensation for 22 lakh 34 thousand 934 farmers!

Compensation For Damages | राज्यातील अतिवृष्टी आणि पूरामुळे नुकसान झालेल्या २२ लाख ३४ हजार ९३४ शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नुकसान भरपाईची (Compensation For Damages) मदत जाहीर केली आहे. या मदतीसाठी ३ हजार ९३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

२०२३ मधील पावसाळी हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. मात्र, यापूर्वी मदत घेतलेल्या शेतकऱ्यांना याच पिकांसाठी किंवा क्षेत्रासाठी पुन्हा मदत मिळणार नाही.

मदतीची मर्यादा ३ हेक्टरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. जिरायत क्षेत्रासाठी हेक्टरी साडेआठ हजार, बागायतीसाठी हेक्टरी १७ हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी २२ हजार ५०० रुपये मदत दिली जाणार आहे.

२९ फेब्रुवारीला मदतीचा शासन निर्णय झाला असला तरी, अजून बहुतेक ठिकाणी मदत वाटप सुरू झालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे स्वर उमटत आहेत.

वाचा | Anushka Jaiswal Success Story | शिक्षणानंतर नोकरी नाही तर शेती! 27 वर्षांच्या तरुणीचा शेतीतून 45 लाखांचा नफा!

महत्वाचे मुद्दे:

  • २२ लाख ३४ हजार ९३४ शेतकऱ्यांना मदत
  • ३ हजार ९३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर
  • ३ हेक्टरपर्यंत मदतीची मर्यादा
  • जिरायत: हेक्टरी ८,५०० रुपये
  • बागायती: हेक्टरी १७,००० रुपये
  • बहुवार्षिक पिके: हेक्टरी २२,५०० रुपये
  • २९ फेब्रुवारीला शासन निर्णय
  • अनेक ठिकाणी मदत वाटप सुरू नाही

Web Title | Compensation For Damages | Big news! Compensation for 22 lakh 34 thousand 934 farmers!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button