ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather | पुढचे 4 दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, शेतकऱ्यांनो जाणून घ्या धरणांची स्थिती?

Weather | राज्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तर अनेक भागात या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती (Weather Update) निर्माण झाली आहे. ज्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तर शेतकऱ्यांची शेतीतील (Agriculture) पिके भुईसपाट झाली आहे. त्याचवेळी झालेल्या नुकसानीची दुपटीने भरपाई मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. मात्र अशातच पुन्हा एकदा हवामान विभागाने राज्यात पुढचे 4 दिवस मुसळधार पाऊस (Maharashtra Monsoon) पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

वाचा: यंदा सोयाबीनला मिळणार चांगला दर, जाणून घ्या काय आहे कारण..

कोणत्या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस?
हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांत पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाची (Maharashtra Weather) शक्यता वर्तवली आहे. राज्यात पुढचे 4 दिवस पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात यलो अलर्ट
जारी करण्यात आला आहे. तर नांदेड जिल्ह्यात पुढील 24 तासांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवमान विभागाने वर्तवला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला आणि कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वाचा: धक्कादायक! प्रेमसंबंध आले जीवाशी, जळगावात दुहेरी हत्याकांडाने खळबळ, सख्ख्या भावानेच बहिणीचा केला

धरण भरली
राज्यात मुसळधार पावसामुळे धरणे देखील भरली आहेत. उजनी धरण, भंडारदरा धरण चांगलीच भरली आहेत. यामुळे येथील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर धरणे भरल्यामुळे आता शेतकऱ्यांची पुढील काळातील पाण्याची चिंताच मिटली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Warning of heavy rain for the next 4 days in these districts of the state, farmers know is the condition of the dams?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button