पुढच्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसान भरपाई वाटप; कृषी मंत्र्यांचा “या” जिल्ह्यासाठी निर्णय..
From next week, farmers will feel crop insurance and compensation; Decision of the Minister of Agriculture for "this" district
बुलढाणा जिल्ह्यातील पिक विमा (insurrance) संदर्भात मंत्रालयात काल 1 सप्टेंबर 2021 रोजी बैठक झाली. बैठकीमध्ये राज्याचे (agricultural minister) कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी, बुलढाणा जिल्यातील शेतकर्यांना (farmer) ताबडतोब पिक विमा द्यावा व NDRF नुसार नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई द्यावी अशा सूचना, आदेश (order) बैठकीत देण्यात आले आहेत.
कृषी मंत्र्यांचा आदेश-
बुलढाणा जिल्यातील शेतकर्यांच्या पिक विमा (crop insurrance) संदर्भात मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली. २०२१ मध्ये पावसाचा खंड तसेच अतिवृष्टीमुळे सांगली, उस्मानाबाद, लातूर इत्यादी जिल्यातील पात्र शेतकर्यांना २५ टक्के अग्रिम विमा रक्कम देण्याची घोषणा करण्यात आलेली. या पार्श्वभूमीवर कालच्या बैठकीमध्ये राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, बुलढाणा जिल्ह्यातील पालकमंत्री राजेंद्र शिंगणे तसेच सर्व पक्षीय आमदार, खासदार यांच्या उपस्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्यांना पिक विमा दिला जावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली.
या मागण्यांचा विचार करून राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्यांना ताबडतोब पिक विमा (insurance) देण्यात यावा अशा प्रकारचे आदेश दिले आहे.
पुढच्या आठवड्यापासून नुकसान भरपाई वाटप-
फेब्रुवारी व मार्च मध्ये गारपीट पाऊस झालेला होता त्यासाठी बुलढाणा जिल्ह्यासाठी जवळपास २२ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्यातील ५ तालुके पात्र आहेत. ही वाटप पुढच्या आठवड्यापासून होईल असे सांगितले आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा: