ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
जॉब्स

बेरोजगार युवकांचा व शेतकऱ्यांचा आता उभा राहणार स्वतःचा व्यवसाय; घ्या “या” योजनेचा लाभ…

Unemployed youth and farmers will now have their own business; Take advantage of this scheme ...

शेतकर्यांना तसेच ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना स्वताचा व्यवसाय, उद्योग सुरु करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी “मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग” (CM Agriculture and Food Processing Industries) योजना आणली आहे. ही योजना २०२१-२२ मध्ये राबविण्यासाठी मंजुरी (Approval) देण्यात आली आहे. हा महत्वपूर्ण शासन निर्णय (Governance decision) ७ सप्टेंबर रोजी घेण्यात आला आहे.

जास्तीत जास्त 10 लाख रु. पर्यंत अनुदान दिले जाते-

नाशवंत फळे, भाजीपाला, अन्न धान्य, कडधान्ये, तेल बिया अशा प्रकारच्या विविध कृषी निगडीत प्रक्रिया उद्योगांना सुरु करण्यासाठी योजनेच्या अंतर्गत अनुदान दिले जाते. यामध्ये ग्रामीण युवक, खासगी उद्योग, शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, यांचे फळ भाजीपाला नाशवंत शेतमाल आहेत. या शेत मालांच्या प्रकल्पांना (Projects) उभा करण्यासाठी ३५ टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. जास्तीत जास्त १० लाख रु. पर्यंत योजनेच्या अंतर्गत दिले जाते. यानुसार ही योजना २०२१-२२ राबविण्यासाठी ७ सप्टेंबर २०२१ रोजी शासन निर्णय घेण्यात (Governance decision) आला. शासन निर्णय सविस्तरपणे पाहूया..

शासन निर्णय –

१) मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सन २०२१-२२ मध्ये राज्यात राबविण्यासाठीरु. ७५०० लक्ष एवढ्या रकमेच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

२) चालू वर्षी या योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून दिल्यानंतर सुरुवातीला सन २०१८-१९ व २०१९-२० मधील प्रलंबित प्रकरणासाठी वापरण्यात यावा. प्रलंबित प्रकरणे निकाली निघाल्यानंतर उर्वरित निधी सन २०२१-२२ मधील पात्र प्रकल्पासाठी वापरण्यात यावा असे सांगितले आहे.

३) संदर्भाकीत शासन निर्णय दि. २०/६/२०१७ विहित केलेल्या तरतुदीनंतर योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी व त्यानुसार योजना सन २०२१-२२ मध्ये राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना कृषी आयुक्तालय स्तरावर निर्गमित कराव्यात अशी सूचना दिली.

४) सदर योजना सन २०२१-२२ मध्ये राबविण्याकरिता आयुक्त, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी तर सहायक संचालक (लेखी), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले.

शासन निर्णय- महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध केला आहे. अधिक सविस्तर माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या…

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button