कृषी तंत्रज्ञान

ऊस लागवडीचे सुद्धा यंत्र? कधी ऐकले आहे का? पहा “या” विद्यार्थ्यांनी बनवले चक्क ऊस लागवडीचे यंत्र..

Cane planting machine too? Ever heard of it? See "Ya" students made chucky cane planting machine ..

पारंपरिक पद्धतीनुसार बरेच शेतकरी शेती लागवड (Agricultural cultivation) करत असतात. मोठ्या प्रमाणात पारंपरिक शेती (Traditional farming) केली जात असल्याचे दिसते. याचा विचार करून काही तरुणांनी ऊस लागवडीचे यंत्र (Sugarcane planting machine) तयार केले आहे. पारंपरिक लागवड पद्धतीनुसार एक एकर लागवडीसाठी ८ ते १० मजुरांना ८ तास म्हणजे पूर्ण दिवस लागतो.

ऊस लागवड यंत्राद्वारे (Sugarcane planting machine) एक एकर लागवडीसाठी दोन मजूर पुरेसे पडतात व ऊस लागवडीचे काम फक्त तीन तासांत काम पूर्ण होते. उसाच्या लागवडीसाठी लागणाऱ्या मजुरांची टंचाई भासत असल्याने व लागवडीला तितकाच खर्च करावा लागत असल्याने या सर्व गोष्टींचा विचार करून यंत्र विकसित केले. हे यंत्र अत्यंत उपयोगी पडत असल्याचे दिसत आहे.

वाचा : गव्हाच्या या “तीन” जाती देतील अधिक उत्पन्न; भरघोस उत्पन्न काढायचे आहे का? मग पहाच…

ऊस लागवड यंत्र बनवणारे विद्यार्थी –

कमी वेळेमध्ये, कमी खर्चात व कमी कष्टामध्ये ऊस लागवड करण्यासाठी कळंब (ता. इंदापूर) येथील फडतरे नॉलेज सिटीमधील बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निक महाविद्यालयातील प्रसाद पाठक, काशिनाथ दुबळे, रोहन लांडगे व वैभव जगताप या विद्यार्थ्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांना प्राचार्य नागेश ठोंबरे, विभाग प्रमुख उदय चव्हाण यांनी मार्गदर्शन केले आहे.

ऊस लागवड यंत्राविषयी –

ऊस लागवड यंत्रावर (Sugarcane planting machine) चार चाके असणाऱ्या गाड्यावर एक माणूस बसण्याची सोय केलेली आहे. गाडीच्या पुढील बाजूला चरी खोदण्यासाठी छोटा फाळ बसवला आहे. त्यांच्या मागोमाग वरून खालीपर्यंत पोकळ असा पाइप बसवला आहे. त्याच्या शेजारी उसाचे कांडे साठवण्यासाठी बादली बसवली आहे. दुसरा माणूस ही गाडी ढकलतो. पाइपच्या मागे एका व्यक्ती बसण्यासाठी सीट तयार केली आहे. गाडीत बसलेला हाताने उसाचे कांड पाईप मध्ये टाकेल. गाडा जसा पुढे जाईल तशी आपोआप माती ढकलली जाईल यासाठी दोन तिरक्या प्लेट खाली बसविल्या आहेत.

वाचा: मोठी बातमी: महिंद्राचा नवीन “रोटावेटर” लॉन्च, आता शेतीची मशागत करता येणार अधिक सोप्प्या पद्धतीत..

इंजिनद्वारे माणसाचे श्रम कमी करणार –

दुसऱ्या प्रकारामध्ये या विद्यार्थ्यांनी चारचाकी यंत्राला चालविण्यासाठी चेन स्प्रॉकेट आणि पॅडेलची (Of sprocket and paddle) सोय केली असल्याचे सांगितले आहे. सायकलप्रमाणे पॅडल मारून ते चालवता येते. भुसभुशीत मातीमध्ये पॅडलद्वारे चालवण्यासाठी अधिक श्रम पडत असल्याचे लक्षात आले.


माणसांचे चालवण्याचे श्रम कमी करण्यासाठी इजिनद्वारे यंत्राला ऊर्जा (Energy to the machine by the engine) मिळवून देण्याचं काम केले असल्याचे सांगितले आहे. त्यावर अद्याप प्रयोग सुरू असल्याचे विभाग प्रमुख उदय चव्हाण यांनी सांगितले. या यंत्रामुळे शेतकऱ्यांच्या व मजुराच्या कष्ट आणि वेळेमध्ये बचत होईल. याच्या चाचण्या प्रत्यक्ष शेतामध्ये घेतल्या जात असून, येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती दिली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button