Sandalwood Farming | अलिकडच्या काळात अनेक शेतकरी पारंपारिक शेतीला बगल देऊन आधुनिक आणि श्रीमंत करणाऱ्या शेतीकडे वळत आहेत. चंदन शेती (Sandalwood Farming) ही अशाच एका श्रीमंत करणाऱ्या शेतीचा प्रकार आहे. चंदन लाकडाची मोठी मागणी आणि त्याची मौल्यवानता यामुळे चंदन शेतीतून मोठा नफा मिळवू शकता.
कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात चंदन शेती:
भारतात कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चंदन शेती केली जाते. चंदनाचे लाकूड आणि त्यापासून बनवलेल्या वस्तूंना मोठी मागणी असल्यामुळे अनेक शेतकरी चंदन शेतीकडे वळत आहेत.
वाचा| Discount On Seeds | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बियाण्यांवर ५०% थेट सवलत!
चंदन शेतीची योग्य वेळ:
चंदन शेती कोणत्याही हंगामात करता येते. चंदनाचे रोप दोन वर्षांपेक्षा जास्त जुने असावे. रोप लावल्यानंतर त्याची योग्य निगा राखणे आवश्यक आहे. रोप लावलेल्या ठिकाणी पाणी साचू नये याची काळजी घ्यावी.
एकरी कोट्यावधी रुपयांची कमाई:
चंदनाचे लाकूड अतिशय मौल्यवान आहे. त्यापासून विविध वस्तू आणि सुगंधी द्रव्ये बनवली जातात. चंदनाला बाजारात मोठी मागणी आहे आणि त्याची किंमतही खूप जास्त आहे. एका चंदनाच्या झाडापासून 5 ते 6 लाख रुपये मिळू शकतात. एका एकरात सुमारे 600 चंदनाची झाडे लावता येतात. याचा अर्थ एका एकरातून शेतकऱ्याला 30 कोटी रुपये मिळू शकतात.
कमी खर्चात मोठा नफा:
चंदन शेतीसाठी बागायती जमिनीची आवश्यकता नाही. ओसाड आणि माळरानावरही चंदनाची लागवड करता येते. थोड्या नियोजनाने आणि योग्य काळजीने चंदन शेतीतून मोठा नफा मिळवू शकता.
वाचा