कृषी सल्ला

Preservation Tips | धान्यात किडे आणि अळ्या होऊ नये म्हणून करा ‘हे’ सोप्पे उपाय !

Preservation Tips |शेतकरी शेतात पिकवलेले धान्य (cereals) बहुतेक वेळा साठवून ठेवतात किंवा काही लोक वर्षभरासाठी एकदाच धान्य घेऊन ते साठवतात. यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी व इतर कडधान्य साठवून ठेवली जातात. परंतु, धान्यांचा साठा ठेवल्यानंतर त्याची विशेष काळजी घेणे गरजेचं आहे. कारण अनेकदा धान्यांना बुरशी किंवा कीड लागते. यामुळे धान्य खराब होण्याची शक्यता निर्माण होते.

धान्यांना कीड आणि बुरशी लागली तर…

यावेळी एकतर धान्य फेकून तरी द्यावे लागते किंवा त्याला निवडत तरी बसावे लागते. मात्र, धान्यांची योग्य काळजी घेतली तर, त्याला कीड किंवा बुरशी (Fungus) लागत नाही. धान्यांना कीड आणि बुरशी लागू नये, असे आपल्याला वाटत असेल तर, काही घरगुती गोष्टींचा वापर आपण करू शकतो. या गोष्टींचा वापर केल्यास धान्यांना कीड, अळ्या किंवा बुरशी लागणार नाही. तसेच धान्य वर्षनुवर्षे उत्तम टिकून राहते.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

१) तमालपत्र

खरंतर तमालपत्राचा वापर हा पदार्थातील चव वाढवण्यासाठी होतो. त्याच्या मदतीने आपण कीटकांना देखील दूर ठेवू शकतो. जर तांदूळ आणि डाळीमध्ये कीटक आढळत असतील तर, धान्यांच्या डब्यात फ्रेश तमालपत्राची काही पाने ठेवा. यामुळे धान्यात कसल्याही प्रकारचे किडे येणार नाहीत.

२) कडूनिंब

गावाकडे बहुतेक घरांमध्ये धान्यांच्या साठ्यात आठवणीने कडूनिंबाची पानं ठेवली जातात. यामुळे कीटक आणि अळ्या धान्यांच्या डब्यात येत नाही. यासाठी काही कोरडी कडूनिंबाची पानं एका मलमलच्या कापडात बांधून घ्या आणि हे कापड धान्यांच्या डब्यात एका कोपऱ्यात ठेवा. या उपायामुळे धान्यांच्या डब्यात कीटक येणार नाहीत.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

३) लवंग

तांदूळ आणि डाळींना कीटकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी लवंगेचा वापर होऊ शकतो. यासाठी डब्यांमध्ये खास लवंग ठेवा. याच्या उग्र वासामुळे कीटक धान्यांपासून दूर राहतील आणि मुंग्याही येणार नाहीत. लवंगच्या जागी आपण लवंगाच्या तेलाचा देखील वापर करू शकता.

४) लसूण

खरंतर लसणाचा वास खूपच तीव्र असतो. यामुळे तांदूळ आणि इतर धान्यांच्या डब्यात लसणाच्या काही पाकळ्या कापडात बांधून ठेवा. या उपायामुळे किडे धान्यांपासून दूर राहतील आणि धान्य सुरक्षित राहील.

Some preservation tips for cereals

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button