ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्याकृषी सल्ला

Seed Germination | बियाण्यांची उगवणक्षमता तपासा आता घरच्याघरी ! अशी आहे पद्धत

Seed Germination |राज्यात लवकरच मान्सून (Monsoon) दाखल होईल. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी दणक्यात खरीप हंगामाची (Kharip Season) तयारी सुरू केली आहे. राज्यातील अनेक शेतकरी खरीप पिकांसाठी खते, बी, बियाण्याची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत. दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी योग्य बियाणे निवडणे फार महत्त्वाचे असते.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

घरचे बियाणे वापरताना होते नुकसान

यामुळे याकाळात शेतकरी अतिशय लक्षपूर्वक बियाणे निवडतात. बाहेरील बियाण्यांच्या गुणवत्तेविषयी खात्री नसते. यामुळे शेतकरी बऱ्याचदा पेरणीसाठी घरचेच बियाणे वापरण्याला प्राधान्य देतात. परंतु घरचे बियाणे पेरणीसाठी वापरताना त्याची उगवण क्षमता, शुद्धता, इतर जातींच्या पिकांची भेसळ, रोगट किंवा फुटके बियाणे याकडे दुर्लक्ष केले जाते.

बियाण्याची उगवणक्षमता तपासणी

या बियाणांचा पेरणीसाठी वापर केला तर पिकाची उगवण चांगली होत नाही, यामुळे पेरणीचा हंगाम वाया जाण्याची शक्यता असते. म्हणून तज्ज्ञांकडून बियाण्याची उगवणक्षमता (Seed Germination Test) तपासूनच पेरणी करा. असा सल्ला दिला जातो. दरम्यान बियाण्याची उगवणक्षमता तपासायची कशी हे जाणून घेऊयात …

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

अशी करा बियाण्याची उगवणक्षमता तपासणी

सुरुवातीला धान्याच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मूठभर धान्य घ्यावे. त्यानंतर सर्व पोत्यातील काढलेले धान्य एकत्र करुन घ्यावे. गोणपाटाचे ६ चौकोनी तुकडे करुन हे तुकडे स्वच्छ धुऊन घ्यावेत आणि गोणपाटाचा एक तुकडा जमिनीवर पसरावा. पोत्यातून काढलेल्या धान्यातून सरसकट १०० दाणे, दीड ते दोन सेंमी अंतरावर १० -१० च्या रांगेत गोणपाटाच्या एका तुकड्यावर ओळीत ठेवावेत.

याप्रकारे १०० दाण्याचे तीन नमुने तयार करावेत. तसेच गोणपाट ओले करुन बियाण्यावर दुसऱ्या गोणपाटाचा तुकडा अंथरुन पुन्हा चांगले पाणी शिंपडावे. याशिवाय गोणपाटाच्या तुकड्यांची बियाण्यासकट गोल गुंडाळी करुन थंड ठिकाणी सावलीत ठेवावी. यावर अधून मधून पाणी शिंपडून बियाण्याची गुंडाळी सतत ओली ठेवावी. ६ ते ७ दिवसानंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरवून उघडावी. चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करुन मोजावेत.

तिन्ही गुंडाळ्यांची सरासरी काढून शंभर दाण्यांपैकी ७० किंवा त्यापेक्षा जास्त दाणे जर चांगले कोंब आलेले असतील तर आपले बियाणे बाजारातील बियाण्यासरखेच गुणवत्तेचे आहे असे समजावे. आणि शिफारशीप्रमाणे ते पेरणीसाठी वापरावे. जर उगवण झालेल्या बियाण्याची सरासरी संख्या तुलनेने ७० पेक्षा कमी म्हणजेच ६० पर्यंत असेल तर बियाण्याचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करावी. तसेच साठ टक्क्यांपेक्षा जर उगवणक्षमता कमी आली असेल तर असं बियाणे पेरणीसाठी वापरु नये.

Process of seed germination test

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button