ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Tractor Subsidy| २५ हजार शेतकऱ्यांच्या घरी येणार ट्रॅक्टर ! अनुदान मिळण्यासाठी लाखो अर्ज झाले दाखल …

Tractor Subsidy| पूर्वीच्या काळात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने शेती केली जात होती. यावेळी शेतीच्या मशागतीसाठी बैलजोडी वापरली जात होती. मात्र, हळूहळू तंत्रज्ञानात प्रगती झाली आणि शेतीसाठी नवीन उपकरणे तयार झाली. ट्रॅक्टर यातलेच एक ! आजकाल शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर (Tractor) वापरला जातो.

शेतीसाठी ट्रॅक्टर उपयुक्त

ट्रॅक्टर हे कमी वेळेत जास्त काम करून देणारे यंत्र आहे. यामुळे वेळेची व श्रमाची बचत होते. तसेच ट्रॅक्टरला शेतीसाठी लागणारी अनेक प्रकारची यंत्रे जोडता येतात. यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर सोयीस्कर पडतो. तसेच शेतीच्या कामासाठी मजूर न मिळण्याच्या समस्येवर देखील ट्रॅक्टर उत्तम उपाय आहे.

शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान

मात्र राज्यातील बहुतेक शेतकरी मध्यमवर्गीय किंवा गरीब आहेत. यामुळे शेतकऱ्यांना स्वतःचा ट्रॅक्टर घेणे शक्य होत नाही. म्हणून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळवून देण्यासाठी राज्यसरकारने पुढाकार घेतला होता. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर उपलब्ध व्हावा यासाठी सरकारने ट्रॅक्टरसाठी अनुदान (Subcidy) जाहीर केले होते.

ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज दाखल

यंदा शेतकऱ्यांकडून या अनुदानातील ट्रॅक्टरसाठी मागणी वाढली आहे. यावर्षी राज्यातील १५ लाख २९ हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अनुदानित ट्रॅक्टरसाठी अर्ज केले आहेत. मात्र राज्यात तेवढा निधी उपलब्ध नाही. यामुळे एवढ्या जास्त संख्येला ट्रॅक्टरसाठी अनुदान देणे सरकारला शक्य नाही.

२५ हजार शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर

म्हणून चालू आर्थिक वर्षात राज्यातील फक्त २५ हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळणार आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२२-२३ मध्ये सरकारने १५ हजार शेतकऱ्यांना अनुदानातून ट्रॅक्टर दिले होते. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी जास्त शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान मिळणार आहे.

असे मिळते अनुदान

राज्य सरकारकडून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना एक लाखांचे तर मागासवर्गीय,दिव्यांग, महिला, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सव्वा लाखांचे अनुदान ट्रॅक्टर साठी दिले जाते. त्यानंतर उर्वरित रक्कम शेतकरी हप्त्याने ट्रॅक्टरच्या कंपनीला देतात. सध्या ट्रॅक्टरच्या मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे ट्रॅक्टर खरेदीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत.

More than fifteen lakh applications were submitted for Tractor Subsidy

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button