ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Cars Price | कार खरेदी करणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाणार ; गाड्यांच्या किंमतीत होणार आणखी वाढ

Cars Price |स्वतःच्या मालकीची चार चाकी गाडी म्हणजेच कार खरेदी करणे हे प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते. यासाठी मध्यमवर्गीय लोक रुपया-रुपयाने पैसे साठवत असतात. दरम्यान एका नव्या नियमाचा कार खरेदी करणाऱ्या लोकांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे सामान्य माणसाचे कार खरेदी करण्याचे स्वप्न यंदा महागले आहे.

नवीन उत्सर्जन नियम

यावर्षच्या १ एप्रिलपासून देशामध्येनवीन उत्सर्जन नियम बीएस-६ चा दुसरा टप्पा लागू झाला आहे. यामुळे देशातील बहुतांश सर्वच कंपन्यांनी आपल्या कारच्या किमती ५ टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. जानेवारी, मार्च-एप्रिल आणि मे महिन्यात कंपनीकडून दुसऱ्यांदा कारच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

कोणत्या गाड्यांच्या किंमतीत वाढ झाली

किया इंडिया, एमजी मोटार इंडिया यांनी मार्चमध्ये आणि मारुती सुझुकी व महिंद्रा अँड महिंद्राने एप्रिलमध्ये दुसऱ्यांदा किमती वाढविल्या. होंडाने एप्रिलमध्ये काही मॉडेलच्या, तर टाटा मोटर्सने मेमध्ये व्यावसायिक वाहनांच्या किमती ०.६ टक्के ते ५ टक्के वाढविल्या आहेत.

या महिन्यात आणखी किंमती वाढणार

बीएस-६ च्या दुसऱ्या टप्प्यातील नियमांचे पालन करण्यासाठी सर्व कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना कारमध्ये अतिरिक्त उपकरणे लावावी लागत आहेत. याचाच बोजा आता कंपन्या हळूहळू ग्राहकांवर टाकत आहेत. दरम्यान जूनमध्ये व सप्टेंबरनंतर कारच्या किंमती आणखी वाढू शकतात.

सप्टेंबरमध्ये होऊ शकते ०.५% ते २% वाढ

ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमधील तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार बीएस-६ अंमलबजावणीसाठी ऑटोमोबाईल कंपन्या हळूहळू किमती वाढवित आहेत. अगामी काळात ३ ते २० हजार रुपयांपर्यंत कारच्या किमती वाढू शकतात. सप्टेंबरनंतर यामध्ये आणखी ०.५% ते २% वाढ होऊ शकते.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

गाड्यांच्या वाढलेल्या किंमती

एमजी मोटर इंडिया ३५-६० हजार
महिंद्रा अँड महिंद्रा १५-५१ हजार
किया इंडिया ४०-५० हजार
होंडा १०-५० हजार
मारुती सुझुकी ०८-१५ हजार
टाटा मोटर्स ०३-१५ हजार

Cars price will be increased in next two months

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button