ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Milk Rate | पशुपालकांसाठी खुशखबर! दुधाला ‘इतक्या’ रुपयांचा किमान भाव, जाणून घ्या किती?

Milk Rate | शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. या पशुपालन व्यवसायामध्ये शेतकरी प्रामुख्याने गाईंचे संगोपन करून त्यापासून दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणावर करत असतो. मात्र, हा व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी निर्माण होतात. मागील काही महिन्यांपासून दुधाचे दर (Milk Rate) कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. अलीकडेच गाईच्या दुधाचे दर वाढले असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता दुधाला किमान भाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात दुधाला किती किमान भाव देण्यात आला आहे.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

दुधाला किमान भाव

दुधाच्या खरेदी दरात कपात झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी गाईचे दूध प्रतिलिटर किमान 34 रूपये भाव देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, या बैठकीला दूध उत्पादक शेतकरी संघटना आणि पशुखाद्य उत्पादक प्रतिनिधी उपस्थित असून पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची बैठक पार पडली आहे .

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

शेतकऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक दिलासा

आता दुधाला किमान भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणारं आहे. पशुखाद्याचे दर देखील वाढले असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. आता या दुधाला किमान भाव देण्याच्या निर्णयामुळे दूध उत्पादकांना दुग्धव्यवसाय करताना फारशी अडचण निर्माण होणार नाही.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: Good news for cattle breeders! Minimum price of ‘so much’ rupees for milk, know how much?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button