ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्लाहवामान

Agricultural Consultancy | पुढचे 5 दिवस कसे असेल हवामान? किती पडेल पाऊस? जाणून घ्या पिकनिहाय हवामान आधारित कृषी सल्ला

Agricultural Consultancy | हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस दिनांक 15 ते 19, जुलै दरम्यान आकाश आंशिक ते अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 15 व 16 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. 17 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. 18 व 19 जुलै रोजी सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Agricultural Consultancy) होण्याची अधिक शक्यता आहे. दिनांक 20 व 21 जुलै रोजी सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कृषी सल्ला

  • कपाशी, सोयाबीन, मुग, उडीद, तूर, संत्रा, मोसंबी, लिंबू व अन्य हंगामी, फळ पिके व भाजीपाला पिकामध्ये अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर वाफसा परिस्थिती असताना आंतरमशागतीची (खुरपणी) कामे करावी.
  • किटक नाशके व बुरशीनाशकांच्या फवारणीची कामे 17 जुलै पूर्वी व सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर शांत व स्वच्छ हवामान परीस्थित असताना करावी.
  • तण व्यवस्थापनासाठी उगवण पश्चात तणनाशकांचा वापर हा जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना 17 जुलै पूर्वी व सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर शांत व स्वच्छ हवामान परीस्थित असताना करावी.
  • विभिन्न तणनाशके एकमेकांमध्ये मिसळू नये, विभिन्न सक्रीय घटकांचा तण व्यवस्थापनासाठी सुरक्षित आणि कार्यक्षम तण व्यवस्थापनासाठी फक्त पूर्व-मिश्रित तणनाशकांचा वापर करावा.
  • आवश्यकता असल्यास सोयाबीन, तूर इत्यादी पिकामध्ये विरळणी आणि खांडे भरून घ्यावे.
  • विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्याव इतर पाळीव जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे.
  • जनावरे हे खुल्या पाण्याचे स्त्रोत, नदी किंवा तलाव व ट्रॅक्टर व इतर धातूच्या अवजारांपासून दूर ठेवावे.
  • स्थानिक हवामान अंदाज व सूचना यांचा अंदाज घेऊनच शेती कामाचे नियोजन करावे.
  • पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता, शेतकरी व शेतमजूर यांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: What will the weather be like for the next 5 days? How much will it rain? Know crop wise weather based agriculture advice

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button