ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

How to Generate Income Certificate Online | उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा?

How to Generate Income Certificate Online | काही काम करायचं म्हटलं की कागदपत्रांची आवश्यकता भासते. मग ते विद्यार्थ्यांचं असो वा नागरिकांचे. आताच्या डिजिटल युगामध्ये सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने चुटकीसरशी होत आहे. त्यामुळे नागरिकांना बाहेर जाण्याची गरज किंवा कार्यालयामध्ये खेट्या मारण्याची गरज उरलेली नाही. आपल्या हातातील मोबाईलवर सुटकीसरशी ही कागदपत्रे नागरिक काढू शकतात. आता बरेच का नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला लागतो. परंतु हाच उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये जाऊन खेट्या माराव्या लागतात. परंतु तुम्हाला माहित आहे का? की तुम्ही चुटकीसरशी ऑनलाइन उत्पन्नाचा दाखला काढू शकता. चला तर मग जाणून घेऊया उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? (How to Generate Income Certificate Online)

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

राज्य सरकारची अधिकृत वेबसाईट


राज्य सरकारच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे काढता यावी यासाठी एक ऑनलाईन वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाईटवर नागरिक सहजपणे आपली लागणारी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने काढू शकणार आहे. याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो तुम्हाला उत्पन्नाचा ऑनलाईन दाखला काढण्यासाठी राज्य सरकारच्या याच ऑनलाईन वेबसाईटवर जावे लागणार आहे.

कसा काढाल ऑनलाईन उत्पन्नाचा दाखला?


तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम गुगलवर जाऊन आपले सरकार असे सर्च करावे लागेल. अन्यथा तुम्ही https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en दिलेल्या या लिंकवर क्लिक करून या वेबसाईटवर जाऊ शकता. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे सर्विसेस नावाचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून कोण कोणत्या सुविधा दिल्या जातात त्याबद्दलची माहिती मिळेल. याच पर्यायांमध्ये उत्पन्नाचा दाखला किंवा इंग्रजीमध्ये इन्कम सर्टिफिकेट (Income Certificate) नावाचा ऑप्शन तुमच्यासमोर दिसेल. या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. यानंतर उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला विचारलेली माहितीची पूर्तता करावी लागेल.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

आवश्यक कागदपत्रे

  • फोटो
  • ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, जॉब कार्ड)
  • पत्याचा पुरावा (आधार कार्ड, पाणीपट्टी पावती, वीज बिल,
  • अशा प्रकारचे ऑनलाइन कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म सबमिट करावा लागेल. अशाप्रकारे उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या मोबाईलचा नंबर दिला आहे. त्यावर कन्फर्मचा मेसेज येईल. त्यानंतर तुम्ही पुन्हा लॉगिन करून हा ऑनलाइन उत्पन्नाचा दाखला प्राप्त करू शकता.

Web Title: How to get income certificate online?

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button